Pune Ganeshotsav गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजे वाजवणाऱ्यांवर कोंढवा पोलिसांची कारवाई; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त


गणेशोत्सवात पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांनी मोहम्मदवाडी परिसरात कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे.

गणेशोत्सवात डीजे वर कारवाई

पुणे: गणेशोत्सवात कोंढवा पोलिसांनी मोहम्मदवाडी परिसरात कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे.

मिरवणुकीदरम्यान कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेच्या ‘प्लाझ्मा साउंड सिस्टिम’चा वापर केल्याचे आढळल्याने, पोलिसांनी डीजे यंत्रणेसह ती वाहून नेणारा ट्रक असा एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोहम्मदवाडीतील शेल पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली.

डेसिबलची मर्यादा ओलांडली

शंभू कॉलनी परिसरात गणपती स्थापनेच्या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि तंत्रज्ञाच्या मदतीने साउंड सिस्टिमची तपासणी केली. यावेळी डेसिबलची मर्यादा ओलांडून प्लाझ्मा साउंड सिस्टिमचा वापर होत असल्याचे उघड झाले.

जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील

  • टाटा ७०९ ट्रक: किंमत सुमारे ७ लाख रुपये
  • प्लाझ्मा साउंड सिस्टिम: किंमत सुमारे ७ लाख रुपये (यात दोन बेस, दोन टॉप, मिक्स मशीन आणि प्लाझ्मा सिस्टिमचा समावेश आहे.)

याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

उत्सव काळात ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!