Pune Medical News : मेडिकव्हर हॉस्पिटल, भोसरी येथे ‘द व्हॉइस ऑफ रिकव्हरी’ उपक्रमाचे आयोजन; शस्त्रक्रियेनंतर नव्याने आयुष्य सुरू करणाऱ्या रुग्णांचा गौरव


मेडिकव्हर हॉस्पिटल च्या वतीने ‘द व्हॉइस ऑफ रिकव्हरी’ (The Voice of Recovery) या एका विशेष आणि कौतुकास्पद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मेडिकव्हर हॉस्पिटल चा नाविन्यपूर्ण उपक्रम

पुणे : भोसरी येथील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने ‘द व्हॉइस ऑफ रिकव्हरी’ (The Voice of Recovery) या एका विशेष आणि कौतुकास्पद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गंभीर आजारांवर आणि शस्त्रक्रियेवर मात करून पुन्हा एकदा निरोगी, आनंदी आयुष्याकडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या रुग्णांच्या जिद्दीचा, धैर्याचा आणि त्यांच्या पुनर्वसनाचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या सोहळ्याला रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माय लाइफ आफ्टर सर्जरी मुख्य केंद्रबिंदू

या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ‘माय लाइफ आफ्टर सर्जरी’ (My Life After Surgery) हा विशेष विभाग सर्वांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला.

या सत्रात रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त करताना, आजारपणाच्या कठीण काळापासून ते शस्त्रक्रियेनंतर पुन्हा दैनंदिन जीवन सामान्यपणे सुरू करेपर्यंतचा आपला भावनिक आणि शारीरिक प्रवास उपस्थितांसमोर मांडला. उपचारांदरम्यान मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाकडून मिळालेली चोख सेवा, डॉक्टरांचा भावनिक आधार, शस्त्रक्रियेनंतरची पुनर्वसन प्रक्रिया आणि यामुळे आपल्या आयुष्यात झालेले सकारात्मक बदल याबद्दल रुग्णांनी कृतज्ञता व्यक्त केली.

उपक्रमामुळे रुग्णांना मिळाले मानसिक बळ

या अनोख्या उपक्रमामुळे रुग्णांना त्यांचे अनुभव जाहीरपणे मांडण्याची आणि यशस्वी उपचारांचा आनंद साजरा करण्याची हक्काची व्यासपीठ मिळाले.

तसेच, सध्या शस्त्रक्रियेची तयारी करत असलेल्या किंवा शस्त्रक्रियेनंतर सावरत असलेल्या इतर रुग्णांना यातून मोठी प्रेरणा आणि मानसिक बळ मिळाले.

वेळेवर घेतलेले योग्य उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, शस्त्रक्रियेनंतरची काळजी (Post-operative care), शास्त्रोक्त पुनर्वसन आणि कुटुंबाकडून मिळणारा पाठिंबा हा रुग्णाला बरे करण्यासाठी किती महत्त्वाचा असतो, हे या संवादातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

‘संवाद साधा, चर्चा करा, निर्णय घ्या’

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. राहुल गागरे, डॉ. श्रीरंग कुलकर्णी, डॉ. भगवान आगे आणि डॉ. व्यंकटेश सोनकवडे हे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

त्यांनी रुग्णांच्या मानसिक धैर्याचे आणि पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले.

‘संवाद साधा, चर्चा करा, निर्णय घ्या’ या महत्त्वाच्या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतरच्या सुदृढ जीवनाविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्याविषयीचे निर्णय योग्य माहितीच्या आधारे घेण्याचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी परस्पर संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून मेडिकव्हर हॉस्पिटलने रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!