जळगाव जिल्ह्यात आढळली 42 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
42 वर्षीय महिला आढळली कोरोना पॉझिटिव्ह
जळगाव : जिल्ह्यात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावात एका परिसरातील 42 वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
तिच्याकडे सर्दी, खोकला आणि सौम्य तापाची लक्षणे दिसून आल्यानंतर स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिची आरटी-पीसीआर चाचणी केली.
चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला तात्काळ घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
कुटुंबातील अन्य सदस्यांची तपासणी
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे सांगितले की, सदर महिला गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर फिरली नव्हती.
तरीही तिच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीय सदस्यांची आणि जवळच्या व्यक्तींची चाचणी सुरू करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असली तरी आरोग्य यंत्रणा सतर्क राहिली आहे.
रुग्णांची स्थिती स्थिर असून गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे. यांनी सांगितले, “कोरोनाची साथ पूर्णपणे संपलेली नाही. लसीकरण पूर्ण झालेले असले तरी नवीन व्हेरिएंट्सबाबत दक्षता बाळगणे गरजेचे आहे.
ज्यांना सर्दी-खोकला किंवा ताप असेल त्यांनी ताबडतोब चाचणी करून घ्यावी. पॉझिटिव्ह आढळल्यास घरीच आयसोलेशनचे नियम पाळावेत.”
नागरिकांनी अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा
आरोग्य विभागाने नागरिकांना मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.
शाळा, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सध्या अतिरिक्त चाचण्या वाढविण्यात येत असून संशयित रुग्णांवर लक्ष ठेवले जात आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये थोडी चिंता निर्माण झाली असली तरी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी संपर्क शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांनी अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोना अजूनही संपूर्णपणे नष्ट झालेला नाही. म्हणूनच सावध राहणे हीच सर्वात मोठी उपाययोजना आहे.
जळगाव जिल्ह्यात आढळलेल्या या एकमेव पॉझिटिव्ह प्रकरणानंतर यंत्रणा अधिक सक्रिय झाली असून पुढील काही दिवसांत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.









