Dahi Handi 2026: दहीहंडी निमित्त PMPLच्या मार्गांत बदल; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या पर्यायी मार्ग


दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती भागात शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.

दहीहंडी निमित्त बसमार्गात तात्पुरते बदल

पुणे : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती भागात शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) काही बसमार्गांच्या संचलनात तात्पुरते बदल केले आहेत.

त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पर्यायी मार्गांवरून बससेवा सुरू ठेवण्याचे नियोजन

रस्ते बंद झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी शक्य त्या पर्यायी मार्गांवरून बससेवा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, स्वारगेट आगारातून चालविण्यात येणारे बसमार्ग क्रमांक ३ आणि ६, म्हणजेच वर्तुळाकार स्वारगेट ते पुणे स्टेशन बससेवा दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे.

तसेच, मार्ग क्रमांक १७ (नऱ्हे गाव–शिवाजीनगर) आणि मार्ग क्रमांक ५० (शनिवारवाडा–सिंहगड) या बस रस्ते बंद झाल्यानंतर सारसबाग बसस्थानकावरून चालविण्यात येतील.

मार्ग क्रमांक ११३ (अ. ब. चौक–सांगवी) या मार्गावरील बस महापालिका भवनाजवळ नदीकाठी असलेल्या बसस्थानकावरून सुरू राहतील.

डेक्कन जिमखाना, महापालिका भवन

याशिवाय मार्ग क्रमांक ८, ९, ५७, ५७ब, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४अ, १४४क आणि २८३ या बस रस्ते बंद झाल्यानंतर डेक्कन जिमखाना, महापालिका भवन आणि गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने दोन्ही दिशेने धावतील.

स्वारगेटकडे जाणाऱ्या बससाठी पर्यायी मार्ग

मार्ग क्रमांक २, २अ, ११, ११अ, ११क, १३, २१, ३०, ३७, ३८, २१६, २९७, २९८, ३५४ आणि रातराणी-१ या बस शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रस्ता, डेक्कन आणि टिळक रस्ता या मार्गाने धावतील.

तर स्वारगेटकडून शिवाजीनगरच्या दिशेने जाताना याच बस बाजीराव रस्त्याने धावतील.

स्वारगेट आणि टिळक रस्ता

दरम्यान, मार्ग क्रमांक ७ आणि २०२ या बस रस्ता बंद झाल्यानंतर दोन्ही दिशेने स्वारगेट आणि टिळक रस्त्याच्या मार्गाने चालविण्यात येतील.

वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार पीएमपीने हे तात्पुरते बदल केले आहेत.

दहीहंडी उत्सवादरम्यान वाहतुकीत होणारे बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे आणि पीएमपी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!