Ujjwal Nikam News : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, पोलिसांनी न्यायालयात दाखल केले ५,०५३ पानांचे आरोपपत्र!


केतन अग्रवाल हत्याप्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली असून, या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केतन अग्रवाल प्रकरणात उज्वल निकम यांची विशेष नियुक्ती

पुणे: लोहगड येथील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली असून, या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आधी अपघात भासवून नंतर खून करण्यात आलेल्या या धक्कादायक प्रकरणाचा तपास पूर्ण करत पोलिसांनी न्यायालयात तब्बल ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे.

केतनच्या वडिलांनी या खटल्याची प्रभावीपणे बाजू मांडली जावी यासाठी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली होती.

ही मागणी मान्य झाल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, मुलाला न्याय मिळण्याच्या अपेक्षा वाढल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

उज्वल निकम
उज्वल निकम

५,०५३ पानांचे आरोपपत्र आणि ‘डिजिटल सर्च’चा खुलासा

लोनावळा पोलिसांनी या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन यांना अटक केली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या ५,०५३ पानांच्या आरोपपत्रात अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत.

आरोपींनी घटनेच्या आधी आणि नंतर गुन्ह्याची उकल होऊ नये म्हणून गुगलवर केलेल्या ‘डिजिटल सर्च’ची सविस्तर माहिती आणि इतर तांत्रिक पुरावे या चार्जशीटमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

हत्याप्रकरणाचा थरारक आणि नियोजनबद्ध घटनाक्रम

चार्जशीटनुसार, आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने केतनचा काटा काढण्याचा कट रचला होता:

  • २५ मे: सिया आणि चेतन यांनी मिळून केतन अग्रवाल याला ‘एलिमिनेट’ (हत्या) करण्याचा अंतिम निर्णय घेतला.
  • ३१ मे (रेकी): सिया आणि केतन पहिल्यांदा लोहगडावर गेले. तिथे सियाने संपूर्ण परिसराची पाहणी (रेकी) करून हत्येसाठी योग्य ‘स्पॉट’ निवडला.
  • ६ जून (बाली प्लॅन फ्लॉप व पासपोर्ट चोरी): केतन आणि सिया ६ जूनला बालीला जाणार होते. परंतु, तिथे एकत्र राहावे लागू नये म्हणून ४ जूनलाच हत्येचा प्लॅन आखला गेला, जो घरच्यांच्या विरोधामुळे रद्द झाला. त्यानंतर मुंबई विमानतळाकडे जाताना फूड मॉलवर सियाने केतनचा पासपोर्ट चोरून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला, ज्यामुळे हा दौरा रद्द झाला.
  • १४ जून आणि १९ जून (बर्थडे प्लॅन): १९ जूनला सियाच्या वाढदिवसासाठी महाबळेश्वर येथे रिसॉर्ट बुक करण्यात आले होते. त्यापूर्वी १४ जूनला लोहगडावर पुन्हा हत्येचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो यशस्वी झाला नाही. अखेर आरोपींनी पुढील तारखेला या थरारक हत्याकांडाला अंजाम दिला.

उज्ज्वल निकम यांच्यासारख्या कायदेतज्ज्ञांच्या नियुक्तीमुळे आता या हाय-प्रोफाइल खटल्याच्या पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!