Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून दोन सराईत गुन्हेगारांना अटक; 3 गावठी कट्टे, 4 जिवंत काडतुसे जप्त


भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

जिवंत काडतुसे, दोन सराईत गुन्हेगारांना अटक

पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ही कारवाई २६ आणि २७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली. पहिली कारवाई २६ ऑगस्ट रोजी आंबेगाव पठार परिसरातील साई सिद्धी चौकाजवळ करण्यात आली.

यावेळी ओंकार ऊर्फ बब्या संतोष पवार (वय १८, रा. आंबेगाव पठार) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी कात्रज डेअरीच्या भिंतीलगत दुसरी कारवाई करण्यात आली.

या कारवाईत शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि रवि जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सोहम शेंडकर, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मल्लिकार्जुन कोळी आणि कृष्णा म्हस्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!