Chalisgaon Crime News | पत्नीने अल्पवयीन मुलाच्या साथीने केला पतीचा खून, चाळीसगाव तालुक्यातील घटना


गहाण ठेवलेली मोटरसायकल सोडवण्याच्या वादातून चाळीसगाव तालुक्यात पत्नीने अल्पवयीन मुलाच्या साथीने पतीचा खून केल्याची घटना घडली आहे.

पतीचा खून प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : गहाण ठेवलेली मोटार सायकल सोडवण्याच्या वादातून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या साथीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीला अटक करण्यात आली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ येथे ही घटना घडली.

करणसिंग रामसिंग वंजारी असे मृत पतीचे तर अरुणाबाई वंजारी असे संशयीत पत्नीचे नाव आहे.

नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून

मिळालेल्या माहितीच्या आधारे मयत करणसिंग वंजारी यास मद्यपानाचे व्यसन होते. या व्यसनातून करणसिंग यांनी मोटार सायकल गहाण ठेवली होती.

गहाण ठेवलेली मोटार सायकल सोडवण्यासाठी पैशाच्या वादातून पती पत्नीत वाद झाला.

वाद विकोपाला गेल्याने अल्पवयीन मुलाने सायकलमधे हवा भरण्याचा पंप वडील करणसिंग यांच्या डोक्यात मारल्याचा आणी नंतर मायलेकाने मिळून त्यांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.

मंगळवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडलेल्या  या घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!