Abhijeet Dipke: अभिजीत दीपके अडचणीत! POCSO अंतर्गत तक्रार दाखल? आंदोलनात अल्पवयीन मुलांचा सहभाग


कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता हे नेमकं प्रकरण काय आहे?

अभिजीत दीपके यांच्याविरोधात तक्रार दाखल

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केले होते.

वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

या आंदोलनात यश मिळाल्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिल्लीतील आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या उपस्थितीवरून अभिजीत दीपके  आणि इतर नेत्यांविरोधात इंदौर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल झाली आहे.

मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैझान अंसारी यांनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे.

नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनात अल्पवयीन मुलांना आणण्यात आणि सहभागी करून घेण्यात अभिजीत दिपके यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सोशल मीडियावरील सामग्रीचीही चौकशी

तक्रारीत असे म्हटले आहे की, तपासात गुन्हा आढळल्यास पोक्सो कायदा, भारतीय न्याय संहिता (BNS), आयटी ॲक्ट आणि बाल न्याय कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात यावी. अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

तक्रारदाराने सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील सामग्रीचीही चौकशी करण्याची विनंती केली आहे. अभिजीत दीपके  यांनी या तक्रारीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पोलीस अधिकाऱ्याचा अपमान

दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणातही अभिजीत दीपके  यांच्याविरोधात आरोप झाले आहेत.

त्यांच्या निवासस्थानी पोलीस संरक्षणादरम्यान ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा आरोप महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केला आहे.

पोलीस संरक्षणादरम्यान एका अनोळखी व्यक्तीला अभिजीत दिपके यांची भेट घेण्यासाठी प्रवेश देण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांकडून विचारपूस करण्यात येत होती.

यावेळी संबंधित व्यक्ती आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. त्याचवेळी अभिजीत दिपके घटनास्थळी आले आणि त्यांनी ड्युटीवरील अधिकाऱ्याला ‘गेट आउट’ असे शब्द वापरल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

अल्पवयीन मुलांचा सहभाग

या दोन्ही प्रकरणांमुळे अभिजीत दिपके यांच्यावर आरोपांची मालिका सुरू झाली आहे.

दिल्लीतील आंदोलनातील अल्पवयीन मुलांच्या सहभागाबाबतची तक्रार आणि पोलीस अधिकाऱ्याच्या अपमानाचा आरोप यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

अभिजीत दिपके यांची याबाबतची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. पुढील तपास आणि अधिकृत कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!