Pune Crime News: कोंढव्यात किरकोळ वादातून गोळीबार; रेकॉर्डवरील ६ सराईत गुन्हेगारांना अटक


गणेश उत्सवाच्या भक्तीमय वातावरणात कोंढव्यात किरकोळ वादातून गोळीबार करण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गोळीबार च्या घटनेने उडाली खळबळ

पुणे: शहरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तीमय वातावरण असतानाच, कोंढवा परिसरात किरकोळ वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, कोंढवा पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत या प्रकरणातील ६ सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

गणपती मंडपाजवळ जीवघेणा हल्ला

६ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कोंढवा परिसरातील एका गणपती मंडपाजवळ ही घटना घडली.

मित्रासोबत झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपी दादू भालेराव आणि त्याच्या ८ ते १० साथीदारांनी परिसरात आरडाओरड करत दहशत निर्माण केली. यावेळी दादू भालेराव याने पिस्तुलातून एका तरुणावर थेट गोळी झाडली.

ही गोळी तरुणाच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात जीवघेणा हल्ला आणि गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची रात्रीतून धडक कारवाई

पुण्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून कोंढवा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (DB Team) गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत ६ सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

गोळीबार घटनेतील संशयित
गोळीबार घटनेतील संशयित

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

  • जितेंद्र उर्फ दादू जालिंदर भालेराव (मुख्य आरोपी)
  • लक्ष्मण उर्फ सोनू उर्फ जांभ्या गजरमल
  • प्रज्वल उर्फ पज्या बापू कदम
  • दिनेश रामदास घाडगे
  • कार्तिक महादेव पांडागळे
  • विजय रामदास चोंधे

गावठी पिस्तूल हस्तगत

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल जप्त केले आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

या तरुणांकडे बेकायदेशीर पिस्तूल कुठून आले, हल्ल्यामागील मूळ कारण काय होते आणि जखमी तरुणाची पार्श्वभूमी काय आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

सणासुदीच्या काळात पोलिसांनी केलेल्या या वेगवान कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!