Nagpur Police News | सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोल यांची पोलीस क्वार्टरमध्ये आत्महत्या


नागपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोल यांनी पोलीस क्वार्टरमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

दोन दिवसांपूर्वी केली आत्महत्या केल्याचा संशय

नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या अर्ज शाखेत (अर्ज व प्रोटोकॉल विभाग) कार्यरत असलेल्या 35 वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) ज्ञानेश्वर अंकुशराव झोल यांनी 15-16 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्री पोलिस लाईन टाकळी (गिट्टीखदान पोलीस क्वार्टर) येथील शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली. या घटनेमुळे नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

स्वातंत्र्य दिवस साजरा केल्यानंतर केली आत्महत्या

ज्ञानेश्वर झोल स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) साजरा झाल्यानंतर ड्युटीवरून रात्री उशिरा घरी परतले.

त्यांनी कुटुंबासह जेवण केले. त्यानंतर पत्नी मुलांना झोपवण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली असता, तेव्हा ही घटना घडली.

कुटुंबीय आणि शेजारी यांनी त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृत अधिकारी ज्ञानेश्वर झोल यांच्या पश्चात पत्नी पूजा ज्ञानेश्वर झोल आणि साडेतीन वर्षांची जुळी मुले (एक मुलगा व एक मुलगी) असा परिवार आहे.

पोलीस निरीक्षक आत्महत्या
पोलीस निरीक्षक आत्महत्या

सुसाईड नोट आणि तपास

घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडलेली नाही. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कौटुंबिक कलह, मानसिक तणाव किंवा कामाचा ताण यापैकी नेमक्या कोणत्या कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.

सर्व बाजूंनी चौकशी सुरू असून कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नागपूर येथे शवविच्छेदन आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव मूळगाव जालना जिल्ह्याकडे नेण्यात आले.

या आत्महत्येमुळे सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हादरले आहेत.

ज्ञानेश्वर झोल यांना नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करणारे आणि आशेचे संदेश देणारे म्हणून ओळखले जात होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक तपशील मिळेपर्यंत चौकशी सुरू ठेवल्याचे सांगितले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!