गेल्या दशकात भारतात एफ-सीरीजचे तब्बल ओप्पो कडून ३ कोटींहून अधिक स्मार्टफोन्स विकले गेल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली.
ओप्पो कडून ३ कोटींहून अधिक स्मार्टफोन्स विकले
पुणे: स्मार्टफोन विश्वातील अग्रगण्य ब्रँड ओप्पोने (Oppo) भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय एफ-सीरीजला (F-Series) यशस्वी १० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत, नवी कोरी ‘ओप्पो एफ३५ सिरीज’ (Oppo F35 Series) अधिकृतपणे लाँच केली आहे.
या सिरीज अंतर्गत ओप्पो एफ३५ प्रो ५जी (Oppo F35 Pro 5G) आणि ओप्पो एफ३५ ५जी (Oppo F35 5G) हे दोन भन्नाट मॉडेल्स ग्राहकांच्या भेटीस आले आहेत.
कंपनीने या नव्या सिरीजला ‘ग्रुप सेल्फी एक्सपर्ट’ (Group Selfie Expert) म्हणून सादर केले आहे.
या फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे याचा १०० अंश (100-degree) फील्ड ऑफ व्ह्यू असलेला ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा आहे, ज्यामुळे आता ग्रुप सेल्फी घेणे अधिक सोपे आणि दर्जेदार होणार आहे.
गेल्या दशकात भारतात एफ-सीरीजचे तब्बल ३ कोटींहून अधिक स्मार्टफोन्स विकले गेल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली.

दमदार फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटी
- प्रो मॉडेलचा कॅमेरा: ‘ओप्पो एफ३५ प्रो’मध्ये ओआयएस (OIS) तंत्रज्ञानासह ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याद्वारे फ्रंट आणि रिअर दोन्ही कॅमेऱ्यांमधून ४के (4K) व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.
- प्रोसेसर आणि डिस्प्ले: ‘एफ३५ प्रो’मध्ये वेगवान कामगिरीसाठी मीडियाटेक डायमेंसिटी ७३६० मॅक्स (MediaTek Dimensity 7360 Max) प्रोसेसर आणि १४४ हर्ट्झ एएमोलेड (AMOLED) डिस्प्ले दिला आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग: दोन्ही मॉडेल्समध्ये तब्बल ८००० एमएएच (mAh) ची महाकाय बॅटरी असून, ती चार्ज करण्यासाठी ८० वॅटचा सुपरव्हूक (SuperVOOC) फ्लॅश चार्जिंग सपोर्ट मिळतो.
- इतर वैशिष्ट्ये: हे फोन्स वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स रेटिंगसह येतात, ज्यामुळे फोन दीर्घकाळ सुरक्षित आणि कार्यक्षम राहतो.
किंमत आणि उपलब्धता
भारतीय बाजारपेठेत ओप्पो एफ३५ प्रो ५जीची किंमत ४५,९९९ रुपयांपासून, तर ओप्पो एफ३५ ५जीची किंमत ३८,९९९ रुपयांपासून सुरू होते.
ही सिरीज ग्राहकांसाठी प्रमुख रिटेल स्टोअर्स, ओप्पो इंडियाचे अधिकृत ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
प्रीमियम डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ असलेल्या या सिरीजला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.









