Jalgaon jila Bank | जळगाव जिल्हा बँक निवडणुक तयारीला वेग, नोव्हेंबरमध्ये मतदानाची शक्यता


जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूक हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबर मध्ये मतदानाची शक्यता आहे.

जिल्हा बँक निवडणुक  खर्चासाठी 15 लाख जमा

निवडणुक प्रक्रियेसाठी आवश्यक खर्च भागविण्यासाठी बँकेने सहकार विभागाकडे 15 लाख रुपये आगाऊ जमा केले आहेत.

या निधीनंतर निवडणूक च्या प्रशासकीय तयारीला अधिकृतपणे सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

यंदा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सुमारे आठ हजार मतदार सभासद नवीन संचालक मंडळाची निवड करणार आहेत.

कार्यकाळ पूर्ण होत असल्याने निवडणुक

जिल्हा बँकेची मागील निवडणुक नोव्हेंबर 2021 मध्ये झाली होती. नियमानुसार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने यंदा पुन्हा निवडणूक होणार आहे.

त्यासाठी मतदार यादी अद्ययावत करणे, हरकती आणि दावे निकाली काढणे, निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती, मतदान केंद्रांची तयारी, मतमोजणीची व्यवस्था तसेच इतर प्रशासकीय बाबींसाठी जमा करण्यात आलेल्या निधीचा वापर केला जाणार आहे.

जिल्हा बँकेला शतकाचा इतिहास

शतकाहून अधिक इतिहास असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना 1916 मध्ये झाली होती.

मोजक्या सभासदांपासून सुरू झालेली ही संस्था आज हजारो संस्थात्मक मतदारांची बँक बनली आहे.,

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात तिचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या निवडणूककडे राजकीय आणि सहकार क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.

दहा वर्ष संचालक राहिलेल्या व्यक्तींना निवडणुक लढता येणार नाही

यंदाच्या निवडणूकत एक महत्त्वाचा नियम लागू होणार आहे. सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही.

त्यामुळे अनेक विद्यमान दिग्गजांना निवडणूकपासून दूर राहावे लागू शकते.

मात्र, आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी काही नेते कुटुंबातील सदस्य किंवा निकटवर्तीयांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे.

निवडणूकची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी प्रशासकीय हालचालींना सुरुवात झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणूकचा राजकीय रंग आता अधिक गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!