Jalgaon Crime News | भूकर मापक अधिकाऱ्याने 71 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने केली अटक


जळगाव येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील भूकर मापक अधिकाऱ्याला 71 हजार रुपयांची लाच घेताना एसीबी पथकाने आज ताब्यात घेतले.

अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबी पथकाने घेतले ताब्यात

शेतजमिनीची मोजणी व संबंधित शासकीय काम करून देण्यासाठी 71 हजार रुपयांची लाच घेताना एसीबी पथकाने आज रंगेहाथ ताब्यात घेतले.

या प्रकरणात डेटा एंट्री ऑपरेटरचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेले भूकर मापक अधिकारी राहुल ताराचंद कोळी तर डेटा एंट्री ऑपरेटर कल्पेश सोमनाथ पाटील असे नाव आहे.

अतिरिक्त रक्कमही मागितल्याचे उघड

तक्रारदार यांच्या शेतजमिनीची मोजणी व इतर शासकीय कामे करून देण्यासाठी सुरुवातीला 70 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.

पडताळणीदरम्यान नोटीस पाठवण्यासाठी स्टॅम्प शुल्काच्या नावाखाली अतिरिक्त रक्कमही मागितल्याचे उघड झाले. त्यानंतर भूकर मापक अधिकाऱ्याने स्वतःसाठी व कार्यालयाच्या नावाखाली एकूण 71 हजार सातशे रुपये लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) दाखल करण्यात आली होती.

एसीबीने सापळा रचला, अन केली अटक

तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. आज करंज (ता. जि. जळगाव) येथील बसस्थानक परिसरात उपअधीक्षक राहुल ताराचंद कोळी यांना 71 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

डेटा एंट्री ऑपरेटर कल्पेश सोमनाथ पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे यांच्या नेतृत्वात व पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!