CJP च्या बैठकीत अभिजीत दिपके चहा वाटत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो पाहून जबरदस्त टीका केली जात आहे.
अभिजीत दिपके ने आणला चहाचा ट्रे
अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची महत्वाची बैठक सुरू आहे.
या बैठकीला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी दाखल झाले असून येथे पक्षाची आगामी दिशा आणि संघटना विस्तार कसा करायचा याबाबत चर्चा होणार आहे.
बैठक दिपके यांच्या घरीच आयोजित करण्यात आली आहे.
सकाळपासूनच घराबाहेर मोठी गर्दी जमली असून अनेक लोक भेटीसाठी येत आहेत. अभिजीत दिपके यांनी मीडियासोबत संवादही साधला.
व्हिडिओ वर होतेय जबरदस्त टीका
या बैठकीदरम्यानच अभिजीत दिपके यांचा एक वेगळा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये दिपके स्वतः प्लेटमध्ये चहाचे कप घेऊन घराबाहेर उभे असलेल्या लोकांना, पत्रकारांना आणि कॅमेरामनला चहा वाटताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी दिपके यांची दुसरी बाजू पुढे आल्याचे सांगितले.
मात्र काहींनी याला केवळ पब्लिसिटी स्टंट ठरवत दिपके यांना खडेबोल सुनावले आहेत. ट्रोलर्सही या व्हिडिओवर तुटून पडले आहेत.
CJP ला आंदोलनामुळे मिळाली ओळख
दिपके अमेरिकेतून भारतात आल्यानंतर थेट जंतर मंतरवर आंदोलन करून मोठा धमाका केला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू झालेल्या या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
फक्त दिल्लीतील जंतर मंतरच नव्हे तर देशातील अनेक शहरांमध्येही आंदोलनाची धग पसरली.
कॉकरोच जनता पार्टी शेवटपर्यंत आपल्या मागणीवर ठाम राहिली.
अखेर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला. या यशस्वी आंदोलनामुळे दिपके यांच्या पार्टीला मोठी ओळख मिळाली.
दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्यापासून त्यांच्या घरी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सतत लोक भेटीसाठी येत आहेत.
सध्या चालू असलेल्या बैठकीत पक्षाची भविष्यातील रणनीती ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष दिपके यांच्या निवासस्थानाकडे लागले आहे.








