Education News | मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट तर्फे ‘एमबीए इन हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ कोर्स सुरू


पुणे  : मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंटने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून ‘एमबीए इन हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ पाठ्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.

एमबीए इन हेल्थ केअर मुळे नोकरीच्या संधी

या पाठ्यक्रमाला नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता मिळाली आहे. ही माहिती संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. सरोजा अस्थाना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतातील आरोग्य सेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे. त्यामुळे लाखो नोकर्‍या निर्माण होत आहेत. 2030 पर्यंत याची मागणी दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.

हाच धागा पकडून एमबीए इन हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हा कोर्स सुरू करण्यात आला आहे.

यावेळी एमआयआरएमचे कार्यकारी संचालक डॉ. विलास फरांदे आणि प्रा. सुनील चव्हाण उपस्थित होते.

नोकरीसाठी सर्वतोपरी सहकार्य

डॉ. सरोजा अस्थाना म्हणाल्या, “वैद्यकीय क्षेत्रात या कोर्सनंतर मोठ्या संधी उपलब्ध आहेत. हा पाठ्यक्रम रुग्णालय व फार्मा ऑपरेशन्स, मेडटेक इनोव्हेशन, हेल्थकेअर अ‍ॅनालिटिक्स आणि धोरण या क्षेत्रांमध्ये व्यावहारिक कौशल्ये व सखोल ज्ञान विकसित करतो.

कॉर्पोरेट हॉस्पिटल्स, उद्योग, एनजीओ तसेच हेल्थकेअर क्षेत्रात सेवा देणाऱ्या नामवंत संस्थांमध्ये इंटर्नशिपसाठी संस्थेकडून दरवाजे उघडे ठेवले जातील. तसेच नोकरीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”

महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाची मान्यता

डॉ. विलास फरांदे यांनी सांगितले की, “या पाठ्यक्रमाला महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाची मान्यता आहे. मेडिकल क्षेत्रातील विविध पदवीधर यासाठी प्रवेश घेऊ शकतात.

दोन वर्षांचा कालावधी असून तो माफक शुल्कात उपलब्ध आहे. शासनाच्या विविध सवलती व शिष्यवृत्तीही उपलब्ध आहेत. प्रवेशाची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे.”

संस्थेची 100 टक्के नोकरी देण्याची यशस्वी परंपरा

“संस्थेची 100 टक्के नोकरी देण्याची यशस्वी परंपरा आहे आणि ती पुढेही सुरू राहील. अद्ययावत अभ्यासक्रम, तज्ञ प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, इंटर्नशिप तसेच नोकरीसाठी संपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य दिले जाते.

सध्या हेल्थकेअर क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून या क्षेत्रात कुशल व्यवस्थापन तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध संधी उपलब्ध आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात उत्तम

प्रा. सुनील चव्हाण म्हणाले, “मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट गेल्या 16 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या संस्थापिका डॉ. सरोजा अस्थाना नोबेल पारितोषिक सहभाग विजेत्या असून उच्च शिक्षित अभियंता आहेत.

त्यांनी आयआयटी खरगपूर येथून पीएच.डी. मिळवली आहे. त्यांनी एनसीएलमध्ये संशोधक म्हणूनही कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करीत आहे.”

या संस्थेच्या कॅम्पसमध्ये 100 बेडचे आयव्ही लीफ आयुर्वेदिक रुग्णालय आहे.

येथे गरजू व गरीब रुग्णांना माफक दरात सेवा दिली जाते. मालेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासोबत संयुक्तपणे कार्य केले जाते.

एमबीए इन हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’चे उद्देश

  • विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा क्षेत्रातील नेतृत्व व प्रशासकीय भूमिकांसाठी तयार करणे
  • आरोग्य सेवा व्यवस्थापन तत्त्वे व व्यवसाय धोरणाचे सखोल ज्ञान देणे
  • आरोग्य सेवा संस्थांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये प्रदान करणे
  • आरोग्य सेवा क्षेत्रातील मानव संसाधन, विपणन, कार्यसंचालन, वित्त, तंत्रज्ञान व नवीनतम प्रवाहांची सखोल माहिती देणे
  • रुग्णालय व आरोग्यसेवा धोरणे, नियम, विनियमन, प्रमाणित कार्यपद्धती व नीतिमत्ता समजून घेण्याची क्षमता विकसित करणे
  • व्यावहारिक शिक्षण, संस्था-उद्योग समन्वय, अनुभवात्मक शिक्षण, चिकित्सक विचार व स्वयंअध्ययन कौशल्ये विकसित करणे

अधिक माहितीसाठी मो. नं. 9923810437 /9209061808 वर संपर्क साधा किंवा www.mirm.mgi.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!