जळगाव :शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगावात शिक्षण संस्थाचालकांच्या कारनाम्यांचे 13 हजार पानांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
शालार्थ आयडी घोटाळा संस्थाचालक फरारी
तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या अटकेनंतर शेंदुर्णी येथील शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्या पाठोपाठ जिल्ह्यातील 10 पेक्षा अधिक संस्थाचालक फरारी झाले आहेत.
या प्रकरणात नाशिक पोलिसांनी जळगाव शिक्षण विभागाकडून 13 हजार पानांचे ठोस पुरावे जप्त केले आहेत. या कागदपत्रांचा उपयोग दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी करण्यात येत आहे.
शालार्थ आयडी घोटाळा मुख्य मुद्दे
संजय गरुड यांच्या संस्थेतील 103 शिक्षकांना सरासरी 25 लाख रुपयांपर्यंत सेवेतील फरकाचे पैसे मिळाले होते. हे पैसे शिक्षकांच्या खात्यातून थेट पतसंस्थेतील एका खासगी खात्यात वळवल्याची माहिती समोर आली आहे.
बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण
एप्रिल 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलकत्ता उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत 2016 मधील 25753 शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. महाराष्ट्रातही शालार्थ आयडी घोटाळा बाबत असाच निर्णय झाल्यास, आतापर्यंत घेतलेले पूर्ण वेतन व फरकाची रक्कम शासनाला परत करावी लागेल, अशी भीती शिक्षक वर्गात पसरली आहे.
अनेक शिक्षकांनी नोकरीसाठी संस्थाचालकांना देणगी म्हणून लाखो रुपये दिले आहेत. आता संस्थाचालक पसार झाल्याने व नोकरी जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिक्षक चिंताग्रस्त आहेत.
काही ठिकाणी बडतर्फी झाल्यास पगार व फरक परत करण्यासाठी न्यायालयीन लढाईसाठी वेगळा निधी उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही समोर आले आहे.
लढा निधीचा आरोप
बोगस शालार्थ आयडीद्वारे नोकरी मिळवून फरकाच्या पैशातून मोठी रक्कम संस्थेला दिलेल्या शिक्षकांना, नोकरी जाण्याची भीती दाखवून एजंट मार्फत “न्यायालयीन लढाई” च्या नावाखाली अतिरिक्त निधी गोळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
संजय गरुड यांनी आपल्या मुलालाही दोन वर्षांपूर्वी त्यांच्या स्वतःच्या संस्थेत नोकरीवर ठेवले होते. या नावाचा बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात समावेश आहे का, याचीही पोलिस तपास करत आहेत.
शालार्थ आयडी घोटाळा चे मूळ जळगाव जिल्ह्यात असल्याचे तपासात समोर आले आहे. नाशिक पोलिसांनी या रॅकेटची बारकाईने चौकशी करत विविध शाळा व संस्थांमधून 13 हजार पानांचे पुरावे जप्त केले आहेत.
संस्थाचालकांसोबत पंटर आणि काही नातेवाईक कर्मचारीही फरारी झाले आहेत.









