Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजना: 92 लाख बहिणींना लाभ बंद, जळगावात 2 हजार महिलांनी योजना नाकारली


जळगाव : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लाखो लाभार्थ्यांना एकाचवेळी एकच योजनेचा लाभ घेता येणार नसल्याच्या शासन निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे.

लाडकी बहीण योजना जळगाव जिल्ह्यातील चित्र

सुमारे 92 लाख लाडक्या बहिणींना विविध कारणांमुळे योजनेचा लाभ बंद झाल्याने त्या संतप्त झाल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील दोन हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको म्हणत संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केले आहेत.

विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

मात्र, आता कडक नियमावली आणि निकषांची अंमलबजावणी सुरू झाल्याने मोठ्या संख्येने महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे.

केवायसी पूर्ण न झाल्याने, चारचाकी वाहनाच्या मालकीमुळे, अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असल्याने अनेक लाभार्थी बाद झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज

जळगाव जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्याचे अर्ज दाखल करण्याची संख्या वाढली आहे.

जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ऋषिकेश काळे यांनी याची पुष्टी केली.

या महिलांनी स्पष्टपणे सांगितले की, “एकाचवेळी दोन्ही योजनांचा लाभ घेता येत नसल्याने आम्ही लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सोडून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार आहोत.”

तांत्रिक कारणामुळे केवायसी अपूर्ण

दरम्यान, काही महिलांना तांत्रिक कारणांमुळे केवायसी पूर्ण झाले असतानाही लाभ मिळत नसल्याने शासकीय कार्यालयांमध्ये खेटे घालण्याची वेळ आली आहे.

युती सरकारला मोठ्या मताधिक्याने विजयी करणाऱ्या लाडक्या बहिणींना आता नियमावलीच्या आधारावर वगळले जात असल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

ही घटना राज्यातील इतर जिल्ह्यांतही घडत असल्याचे चित्र दिसत आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!