Jalgaon Crime News : सीमेवर तैनात जवानाच्या पत्नीने ५ वर्षांच्या मुलासह संपवलं आयुष्य; ऐन गणेशोत्सवात जळगाव सुन्न


सीमेवर तैनात जवानाच्या पत्नीने ५ वर्षांच्या मुलासह संपवलं आयुष्य; ऐन गणेशोत्सवात जळगाव सुन्न झाले आहे.

गणेशोत्सवात धामधूम सुरू असताना, काळीज पिळवटून टाकणारी घटना

जळगाव: सर्वत्र गणेशोत्सवात धामधूम सुरू असताना आणि बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असतानाच, जळगाव शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

जळगावमधील तळेले कॉलनीतील ‘विघ्नहर्ता’ चौकाजवळ राहणाऱ्या हेमांगिनी निखिल महाजन (वय २८) यांनी आपला ५ वर्षांचा निष्पाप मुलगा शौर्य याच्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली.

सीमेवर तैनात जवानाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

विशेष म्हणजे हेमांगिनी यांचे पती निखिल महाजन हे भारतीय सैन्यदलात राजस्थान येथे कार्यरत असून, सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत.

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानाच्या घरातच ऐन सणासुदीच्या काळात असा दुःखाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र दुःख व्यक्त होत आहे. महाजन कुटुंब हे परिसरात अत्यंत नम्र आणि मनमिळाऊ म्हणून ओळखले जायचे.

अशी उघडकीस आली घटना

सोमवारी दुपारच्या सुमारास घरात सन्नाटा पसरला होता. हेमांगिनी आणि चिमुकला शौर्य दोघेच घराच्या खालील मजल्यावर होते, तर कुटुंबातील इतर सदस्य वरच्या मजल्यावर होते.

सायंकाळी जेव्हा निखिल यांची आई खाली आली, तेव्हा त्यांना दरवाजा आतून बंद दिसला.

खूप हाका मारून आणि दार ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता, समोर अत्यंत विदारक दृश्य होते. दोघांचेही मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

हेमांगिनी यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ज्या वयात हातामध्ये बाप्पाचा प्रसाद आणि खेळणी असायला हवी होती, त्या वयात ५ वर्षांच्या निष्पाप शौर्यलाही या जगाचा असा करुण निरोप घ्यावा लागल्याने उपस्थितांचे डोळे पाणवले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!