Independence Day News | कोकरुड येथे झेंडावंदनादरम्यान शिक्षक मनोहर कांबळे यांचे हृदयविकाराने निधन


मुख्य झेंडावंदन, आणि वंदे मातरम् संपल्यानंतर महाराष्ट्र गीत सुरू असतानाच शिक्षक मनोहर शामराव कांबळे यांना अचानक चक्कर आली आणि ते कोसळले.

शिक्षक मनोहर कांबळे मुख्य झेंडावंदन सोहळ्यास उपस्थित

मातोश्री हिराईदेवी देशमुख प्राथमिक शाळेचे शिक्षक मनोहर शामराव कांबळे (वय ४५, मूळ गाव नेर्ले, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांचे झेंडावंदनाच्या कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक मनोहर कांबळे यांनी प्रथम आपल्या शाळेतील झेंडावंदनाचा कार्यक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते गावातील पारावर आयोजित मुख्य झेंडावंदन सोहळ्यास उपस्थित राहिले.

मुख्य झेंडावंदन, राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् संपल्यानंतर महाराष्ट्र गीत सुरू असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते कोसळले.

उपस्थितांनी तत्काळ प्राथमिक उपचार केले, ज्यामुळे काही वेळ त्यांना बरे वाटल्यासारखे झाले.

मात्र अवघ्या काही मिनिटांतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

शिक्षक मनोहर कांबळे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, भावजय आणि दोन मुले असा परिवार आहे.

विद्यार्थी-पालकांचा लाडका शिक्षक हरपला

शिक्षक मनोहर कांबळे हे २००७ पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते.

मनमिळाऊ स्वभावामुळे ते विद्यार्थी व पालकांमध्ये अत्यंत प्रिय होते. विशेषतः शिष्यवृत्ती परीक्षेच्या मार्गदर्शनात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते.

त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राने एक अभ्यासू आणि निष्ठावान शिक्षक गमावला आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!