मध्य रेल्वे ने भंगार विक्रीतून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, 5 ऑगस्ट पर्यंत एकूण 202.55 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल मिळाले 202.55 कोटी
मध्य रेल्वे ने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भंगार विक्रीतून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, 5 ऑगस्ट पर्यंत एकूण 202.55 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 76.94% जास्त आहे.
विशेष म्हणजे, भंगार विक्रीतून 200 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची मध्य रेल्वे ची ही आतापर्यंतची सर्वात जलद कामगिरी ठरली आहे.
ही कामगिरी “झिरो स्क्रॅप स्टेटस” मोहिमेअंतर्गत साध्य झाली आहे.
मुंबई विभाग ठरला अव्वल
विभागनिहाय कामगिरीत मुंबई विभागाने 36.78 कोटी रुपयांसह पहिले स्थान पटकावले आहे.
भुसावळ विभागने 33.19 कोटी रुपयांपेक्षा अधिक भंगार विक्री करून दुसऱ्या क्रमांकावर राहून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यानंतर पुणे विभाग (27.22 कोटी), नागपूर विभाग (26.12) आणि सोलापूर विभाग (10.85 कोटी) यांचा क्रम आहे. उत्पादन युनिट्स आणि कार्यशाळांनी एकत्रितपणे सुमारे 68.39 कोटी रुपये कमावले.
मध्य रेल्वेची ही आतापर्यंतची सर्वात जलद कामगिरी
या कालावधीत मध्य रेल्वेने 17.755 मेट्रिक टन रेल्वे रूळ भंगार, 121381 स्लीपर्स, 11,658 मेट्रिक टन लोहयुक्त (फेरस) भंगार आणि 1370 मेट्रिक टन अ-लोहयुक्त (नॉन-फेरस) भंगार विक्री केला.
तसेच 11 लोकोमोटिव्ह, 33 कोच आणि 33 वॅगन्सचीही विल्हेवाट लावण्यात आली.
मध्य रेल्वेने भंगार विक्रीच्या माध्यमातून आर्थिक वर्ष 2026.27 मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, कोट्यवधी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे.
विशेष म्हणजे, भंगार विक्रीतून 200 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची मध्य रेल्वेची ही आतापर्यंतची सर्वात जलद कामगिरी ठरली आहे.
या कामगिरीत भुसावळ विभागाने 33 कोटींपेक्षा अधिक भंगार विक्री करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विभागनिहाय कामगिरीत भुसावळ विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून, एकूण भंगार विक्रीत त्याचा मोठा वाटा आहे.









