Abhijeet Dipke Networth : अभिजीत दिपके यांची एकूण संपत्ती किती?


अभिजीत दिपके सध्याच्या युवा आंदोलनाचे चेहरे म्हणून ओळखले जातात. येथे जाणून घेऊ त्यांची  एकूण संपत्ती किती आहे.

अभिजीत दिपके CJP चे संस्थापक

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक म्हणून त्यांनी देशभरात मोठी चर्चा निर्माण केली आहे.

मात्र, त्यांच्या वैयक्तिक संपत्तीविषयी अनेक अफवा पसरल्या आहेत. वास्तविक परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेतला तर अभिजीत दिपके मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहेत.

अभिजीत दिपके यांचा जन्म 29 सप्टेंबर 1995 रोजी छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाला.

त्यांचे वडील भगवान शंकर दीपके हे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC) चे निवृत्त अभियंते आहेत. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी (बोस्टन युनिव्हर्सिटीतील Public Relations च्या MS पदवीसाठी) कुटुंबाने एज्युकेशन लोन घेतला असून, तो आजही परत करत आहेत. यावरून त्यांची आर्थिक पार्श्वभूमी मध्यमवर्गीय असल्याचे स्पष्ट होते.

पुण्यात शिक्षण आणि आप शी संपर्क

अभिजीत दिपके यांनी पुण्यात पत्रकारिता पदवी घेतल्यानंतर अमेरिकेत शिक्षण घेतले. 2020 ते 2023 दरम्यान ते आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीमशी संबंधित होते. सध्याच्या CJP आंदोलनामुळे त्यांची सोशल मीडिया उपस्थिती वाढली आहे.

इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवरून मिळणारे उत्पन्न (प्रायोजक, कंटेंट) हे त्यांच्या मुख्य कमाईचे स्रोत असू शकतात.

मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत आकडे उपलब्ध नाहीत. विविध अंदाजानुसार त्यांची एकूण संपत्ती (Net Worth) काही कोटी रुपयांमध्ये असू शकते, परंतु हे केवळ अनुमान आहे.

ही आहे खरी संपत्ती

सोशल मीडियावर अभिजीत दिपके यांच्या GF च्या 1500 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या अफवा पूर्णपणे खोट्या ठरल्या आहेत. त्यांचे कुटुंब आणि मित्रमंडळी त्यांना राजकीय क्षेत्रात न येता करिअर फोकस करण्याचा सल्ला देत आहेत.

अभिजीत दिपके यांची मुख्य ताकद ही त्यांची डिजिटल रणनीती आणि युवा संघटन कौशल्य आहे.

पैसा नसतानाही लाखो युवकांना एकत्र करणे हेच त्यांचे खरे ‘नेट वर्थ’ आहे. भविष्यात त्यांच्या आर्थिक स्थितीत बदल होऊ शकतो, परंतु सध्या ते एक तरुण कार्यकर्ते आणि संचार रणनीतिकार म्हणून कार्यरत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!