Jalgaon Crime News | रक्षाबंधन च्या दिवशी बहिणीला भावनिक मेसेज; 17 वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास


भावनिक संदेश सोशल मीडियावर बहिणीला पाठवल्यानंतर रक्षाबंधन ला एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.

‘सगळं सांभाळून घे दीदी, मी जातो,’रक्षाबंधन ला बहिणीला भावनिक मेसेज

जळगाव : रक्षाबंधनाच्या सणादिवशीच जळगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ‘सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो,’ असा भावनिक संदेश सोशल मीडियावर बहिणीला पाठवल्यानंतर एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.

रोहित साहेबराव धनगर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे गमावल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

राखी बांधून घेतल्यानंतर घरी परतला

रोहित हा अकरावीच्या कला शाखेत शिक्षण घेत होता. रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी तो वडिलांसोबत आपल्या आत्याच्या घरी गेला होता.

तेथे बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर तो वडिलांची दुचाकी घेऊन जुना आसोदा रोड परिसरातील आपल्या घरी परतला.

घरी आल्यानंतर रोहितने इन्स्टाग्रामवर बहिणीसोबतचा फोटो पोस्ट केला.

या फोटोसोबत त्याने, ‘हॅपी रक्षा बंधन ताई… सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो,’ असा भावनिक संदेश लिहिला होता.

‘अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा’

जीवन संपवण्यापूर्वी रोहितने इन्स्टाग्रामवर आणखी एक भावनिक स्टेटस ठेवल्याची माहिती आहे.

त्यामध्ये त्याने, ‘अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा, जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा, ना मेरी आंखे नम होगी ना दिल में कोई गम लेके आऊंगा! शुक्रिया…’ असा मजकूर लिहिला होता.

याशिवाय, ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे गमावल्याचे सांगणारा एक व्हिडिओ त्याने आपल्या मित्राला पाठवल्याचीही माहिती समोर आली आहे.

त्यामुळे ऑनलाइन गेमिंगमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र, आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

मित्रांनी धाव घेतली; मात्र उशीर झाला

रोहितचे भावनिक मेसेज आणि स्टेटस पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांना संशय आला.

त्यांनी तातडीने त्याच्या घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत रोहितने घरात गळफास घेतला होता.

मित्र आणि कुटुंबीयांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

रक्षाबंधनासारख्या आनंदाच्या सणादिवशीच अवघ्या १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने धनगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!