प्रनाग हायस्कूल आजनगाव त. मौदा जि. नागपूर येथे स्वातंत्र्य दिवस सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिवस प्रणाग हायस्कूलमध्ये साजरा ओके आता हे झालं तुमचं
प्रनाग हायस्कूल आजनगाव त. मौदा जि. नागपूर येथे स्वातंत्र्याचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव माननीय श्री. पि. एन. गजभिये साहेब यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रमाद्वारे उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
वर्ग दहावीतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनाच्या आठवणीची जपणूक म्हणून विज्ञान शिक्षक श्री. गजभिये सर यांनी शाळेस दिलेल्या विविध प्रजातींच्या झाडांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीरित्या व आनंददायी वातावरणात संपन्न झाला, विद्यार्थ्यांना गोड मिठाई आणि खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव, अध्यक्ष तसेच सौ. समर्थ मॅडम तलाठी, सौ. शिल्पाताई ढोणे पोलीस पाटील आजनगाव, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाअध्यक्ष अनिल मते, पालक वर्ग किशोर वैद्य, ओंकार कोसरे, नामदेव भोयर, माधव हटवार, ओमप्रकाश मेश्राम,
इ. तसेच पोलीस मित्र स्वराज साठवणे, सौ. रिंकूताई पोटफोडे, सौ. मुंगाटे, सौ. क्षिरसागर बाई यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह शाळेच्या मुख्याध्यापिका कु. बाबुलकर मॅडम, शिक्षक श्री. सुरेश टांगले, राजू गेडाम, गुणरत्न गजभिये, लिपिक सुनील डोंगरे यांचे सहकार्य लाभले.









