भोसरी येथील मेडिकव्हर हॉस्पिटलचा १,००० शस्त्रक्रियांचा टप्पा पार

पुणे: मेडिकव्हर हॉस्पिटल, भोसरी येथील नेफ्रोलॉजी आणि युरोलॉजी विभागाने १,००० हून अधिक यशस्वी उपचार व शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय यशानिमित्त हॉस्पिटलमध्ये ‘यशोत्सव व रुग्ण सत्कार सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला ऑल पीसीएमसी सिनियर सिटिझन्स असोसिएशनचे सचिव आनंद साखोरे आणि सीजीएचएस समितीचे सदस्य रामकृष्ण ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. पवन वाखरे आणि सल्लागार युरोलॉजिस्ट डॉ. सुमित चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.उपचारानंतर निरोगी आयुष्य जगत असलेल्या रुग्णांनीही याप्रसंगी आपले अनुभव सांगून डॉक्टरांचे व आरोग्य पथकाचे आभार मानले. उपस्थितांनी हॉस्पिटलच्या गुणवत्तापूर्ण आणि रुग्णकेंद्रित जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेचे कौतुक केले.


1
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!