Tejgyan Foundation: तेजज्ञान फाउंडेशनतर्फे ३० सप्टेंबरपासून ‘द महाआसमानी मॅजिक ऑफ अवेकनिंग’ निवासी शिबिर


तेजज्ञान फाउंडेशन तर्फे सहज सोप्या आणि शक्तिशाली जीवनाचा प्रारंभ करण्यासाठी निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तेजज्ञान फाउंडेशन च्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे: जीवनाचे अंतिम सत्य जाणून घेऊन आनंदी, सहजसोप्या आणि शक्तिशाली जीवनाचा प्रारंभ करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तेजज्ञान फाउंडेशनतर्फे ‘द महाआसमानी मॅजिक ऑफ अवेकनिंग’ (The MahaAasmani MAGIC OF AWAKENING) या ५ दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर दिनांक ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मनन आश्रम (सर्वे नं. ४३, सनस नगर, नांदोशी, किरकटवाडी फाटा, सिंहगड रोड, पुणे) येथे पार पडणार आहे.

तेजज्ञान फाउंडेशन शिबिर
तेजज्ञान फाउंडेशन शिबिर

ताणतणाव दुःखावर कशी मात करावी

आध्यात्मिक गुरू आणि तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांच्या अमूल्य शिक्षणावर आधारित हे शिबिर आहे. ‘आपण कोण आहोत?’, ‘आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे?’, तसेच ‘दैनंदिन जीवनातील दुःख, भीती, चिंता, राग आणि ताणतणाव यांवर मात कशी करावी?’ अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे शिबिर मार्गदर्शक ठरेल.

ध्यान (मेडिटेशन) आणि ज्ञान मार्गाद्वारे साधकांना स्वतःचा शोध घेण्याची (सेल्फ रियलाइजेशन) आणि प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगण्याची कला येथे शिकवली जाणार आहे.

हिंदी भाषेत होणार शिबिर

१८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीसाठी हे शिबिर खुले असून याचे संचालन ‘सत्याचार्यां’तर्फे केले जाईल. हे शिबिर पूर्णपणे हिंदी भाषेत होणार आहे. आश्रम परिसरात महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व सुसज्ज राहण्याची व्यवस्था (डॉर्मिटरी) उपलब्ध आहे.

शिबिराची वेळ: ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८:०० ते १०:३० दरम्यान रिपोर्टिंग करणे अनिवार्य आहे. शिबिराची सांगता ४ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता होईल.

रजिस्ट्रेशनसाठी

https://happythoughts.global/ma-hindi-niwasi/ लिंकचा उपयोग करावा. अधिक माहितीसाठी ९९२१००८०६० या नंबरवर संपर्क साधावा.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!