Ambegaon Police News : गोळीबार करणारे पाच कुख्यात गुन्हेगारांना केले जेरबंद; आंबेगाव पोलिसांची धडक कारवाई


तरुणावर जीवघेणा गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच सराईत गुन्हेगारांना आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्याने अटक केली आहे.

पाच सराईत गुन्हेगारांना आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली अटक

पुणे: जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच सराईत गुन्हेगारांना आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्याने अटक केली आहे.

आरोपींकडून ३ गावठी पिस्तुलं आणि ४ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. न्यायालयाने आरोपींना १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे घटना?

दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास, भेंडी चौक (आंबेगाव बुद्रुक, पुणे) येथील ‘हरणाई कॉम्प्लेक्स’ इमारतीच्या पार्किंगमध्ये फिर्यादी यांचा मुलगा गाडी पार्क करून जिन्याने घरी जात होता.

त्या वेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने गावठी पिस्तूलमधून दोन राउंड फायर केले आणि आरोपी पिस्तूलसह पसार झाले होते.

याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे करत आहेत.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिसांच्या तपास पथकाने समांतर शोध सुरू केला.

गोपनीय माहिती आणि आरोपींच्या मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे पोलीस आरोपींच्या मागावर होते.

अखेर जांभूळवाडी येथील दख्खन हॉटेलच्या रस्त्यालगत हे आरोपी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह सापडले. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

  • शिवदत्त ऊर्फ सोन्या हरीकाका कोंढरे (वय २३ वर्षे)
  • श्रेयश रुपेश काटे (वय २३ वर्षे)
  • सुरज सुभाष डिंबळे (वय २३ वर्षे)
  • अतिष उमेश मोरे (वय २८ वर्षे)
  • ऋत्विक ऊर्फ दगडू पांडुरंग बेलदरे (वय २४ वर्षे)

या पथकाने केली कामगिरी

सदरची यशस्वी कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे आणि पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवाजी पोटोळे व फिरोज शेख यांच्या पथकाने केली.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!