Pune Shikshak Matdarsangh : मतदाराचे आडनाव थेट ‘बॉम्बस्फोट’! निवडणूक यादीतील ‘त्या’ नावाचा नेमका घोळ काय?


वाई (जिल्हा सातारा) येथील एका मतदाराचे आडनाव मतदार यादीत थेट ‘बॉम्बस्फोट’ असे छापून आल्याने राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर खळबळबळ उडाली आहे.

बॉम्बस्फोट नाव प्रसिद्ध झाल्यामुळे उडाली खळबळ

पुणे/सातारा: राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत एक धक्कादायक आणि तितकाच हास्यास्पद प्रकार समोर आला आहे.

वाई (जिल्हा सातारा) येथील एका मतदाराचे आडनाव मतदार यादीत थेट ‘बॉम्बस्फोट’ असे छापून आल्याने राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर एकच खळबळबळ उडाली आहे.

या प्रकारानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.

नेमका घोळ काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, वाई येथील एका शिक्षकाचे खरे नाव ‘प्रशांत बोंबले’ असे आहे.

मात्र, निवडणूक प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे मराठी मतदार यादीत त्यांचे नाव चक्क ‘प्रशांत दादा साहेबाची बॉम्बस्फोट’ असे प्रसिद्ध झाले.

इंग्रजी नाव मराठीत भाषांतरित करताना (Translation Error) हा गंभीर घोळ झाल्याचे समोर आले आहे.

रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

हा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला.

रोहित पवार यांनी टीका करताना म्हटले की, “पुणे मतदारसंघाच्या मतदार यादीत वडिलांच्या नावाच्या जागी ‘बॉम्बस्फोट’ आणि ‘बॉम्ब’ अशी नावे येणे हे अत्यंत हास्यास्पद आणि दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगाचा हा कारभार ढिसाळ आहे.

या अक्षम्य चुकीसाठी जी व्यक्ती जबाबदार असेल, तिच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. मतदार याद्यांमधील असे सर्व घोळ जोपर्यंत पूर्णपणे संपत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत,” अशी मागणीही त्यांनी केली.

कारवाईचे संकेत

या प्रकरणी वाद निर्माण झाल्यानंतर साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तात्काळ समोर येत प्रशासनाची बाजू मांडली आणि वस्तुस्थिती स्पष्ट केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण

  • इंग्रजी यादीत नाव योग्य: संबंधित मतदाराचे नाव इंग्रजी मतदार यादीत ‘Bombale’ (बोंबले) असे अगदी अचूक आहे. मात्र, त्याचे मराठीत भाषांतर करताना सॉफ्टवेअर किंवा डेटा एंट्रीच्या चुकीमुळे ‘बॉम्बस्फोट’ असा गंभीर घोळ झाला.
  • नावात तातडीने दुरुस्ती: हा प्रकार निदर्शनास येताच निवडणूक प्रशासनाने संबंधित नावात तातडीने सुधारणा केली आहे.
  • ६ ऑक्टोबरला अंतिम यादी: दुरुस्त केलेली अंतिम मतदार यादी आगामी ६ ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल.
  • जबाबदारांवर कडक कारवाई: अशा प्रकारची अक्षम्य चूक करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर आणि यंत्रणेवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

मतदारांमध्ये चर्चा, विरोधक आक्रमक

प्रशासनाने ही चूक तांत्रिक असल्याचे सांगत ती सुधारली असली, तरी या ‘बॉम्बस्फोट’ आडनावाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.

सामान्य मतदार याकडे एक तांत्रिक विनोद म्हणून पाहत असले, तरी ऐन निवडणूक काळात अशा चुकांमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर विरोधकांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!