Pune News : भारती विद्यापीठ पोलिसांकडून दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी कट्टा जप्त


भारती विद्यापीठ पोलिसांनी एका कारवाईत दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन ५०,००० रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत केला आहे.

अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन गावठी बनावटीचा कट्टा जप्त

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त आणि गस्त घालण्यात येत आहे.

याच दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत दोन विधीसंघर्षीत बालकांना (अल्पवयीन मुले) ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५०,००० रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

अशा प्रकारे दोघांना घेतले ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अण्णा दराडे आणि त्यांचे पथक परिसरात गस्त घालत होते.

पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सोहम शेंडकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली.

लेकटाऊन रोडवरील शंकरराव राजाराम कदम स्विमिंग पूलसमोरील रस्त्याच्या बाजूला दोन संशयित अल्पवयीन मुले थांबली असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अण्णा दराडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि सापळा रचून दोन्ही विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे ५० हजार रुपये किंमतीचा एक बेकायदेशीर गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला. पोलिसांनी तो कट्टा जप्त केला आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ४७५/२०२६ नुसार भारतीय हत्यार अधिनियम (आर्म्स ॲक्ट) कलम ३ सह २५, आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पोलिसांनी पार पाडली कामगिरी

ही धडक कारवाई पुणे शहराचे पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) मिलिंद मोहिते, भारती विद्यापीठ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक अण्णा दराडे, तसेच पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या काळात अशी घातक शस्त्रे जप्त केल्यामुळे पोलिसांनी संभाव्य अनुचित प्रकार टाळल्याचे बोलले जात आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!