Police News: २१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचा पुण्यात दिमाखात समारोप; ‘एटीएस’ सर्वोत्कृष्ट तर नागपूर शहर उपविजेता !


२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचा पुण्यात दिमाखात समारोप झाला आहे. या मानाच्या स्पर्धेत दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बाजी मारली.

पोलीस कर्तव्य मेळाव्याचे पुण्यात दिमाखादार  आयोजन

पुणे : २१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२६ चा समारोप समारंभ शनिवारी सायंकाळी राज्य राखीव पोलीस बल (SRPF), गट क्र. २, पुणे येथील परेड ग्राउंडवर उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे महासंचालक सदानंद दाते हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या मानाच्या स्पर्धेत दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बाजी मारत ‘सर्वोत्कृष्ट तथा सर्वसाधारण विजेता संघ’ आणि ‘गुन्हे अन्वेषण विभागाचा शताब्दी फिरता चषक’ पटकावला.

तर नागपूर शहर संघाने ‘सर्वसाधारण उपविजेता संघ’ म्हणून बहुमान मिळवला.

पोलीस मेळावा
पोलीस मेळावा

विविध श्रेणीतील उत्कृष्ट कामगिरी व फिरते चषक विजेते संघ

  • 1. सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन चषक : दहशतवाद विरोधी पथक (ATS)
  • 2. पोलीस फोटोग्राफी चषक: नागपूर शहर
  • 3. पोलीस व्हिडिओग्राफी चषक: कोकण परिक्षेत्र
  • 4. माहिती तंत्रज्ञान प्राविण्य चषक: दहशतवाद विरोधी पथक (ATS)
  • 5. श्वान स्पर्धा चषक: नांदेड परिक्षेत्र
  • 6. घातपात विरोधी तपासणी चषक*l: एस.आर.पी.एफ. परिक्षेत्र
  • 7.  कै. अशोक कामटे फिरता चषक: एस.आर.पी.एफ. परिक्षेत्र
  • 8. उत्कृष्ट डॉग चषक : डॉग – आझाद (कोल्हापूर परिक्षेत्र)
पोलीस कर्तव्य मेळावा
पोलीस कर्तव्य मेळावा

पोलीस महासंचालकांचे कौतुक व मार्गदर्शन

विजेत्यांचे अभिनंदन करताना महासंचालक श्री. सदानंद दाते म्हणाले,  कर्तव्य मेळावा ही केवळ एक स्पर्धा नसून दलातील शिस्त, कौशल्य, शारीरिक क्षमता आणि मानसिक तयारी यांचे उत्तम प्रदर्शन आहे.”

त्यांनी अवघ्या काही वर्षांतच उत्कृष्ट कामगिरी करून थेट विजेतेपद पटकावणाऱ्या ‘एटीएस’ (ATS) संघाचे विशेष कौतुक केले.

तसेच, रेल्वे सुरक्षा दलातर्फे (RPF) आयोजित होणाऱ्या आगामी ७० व्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यातही महाराष्ट्र दल अशीच उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हा मूलमंत्र जपून जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले.

 पोलीस कर्तव्य मेळावा
पोलीस कर्तव्य मेळावा

अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती

सुरुवातीला अप्पर महासंचालक (गु.अ.वि.) श्री. सुनील रामानंद यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या कार्यक्रमास दत्तात्रय पडसलगीकर, विनय कुमार चौबे, राजकुमार व्हटकर, नवल बजाज या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विशेष महानिरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन निरीक्षक अर्चना कदम व पोलीस हवालदार सचिन देवडे यांनी केले.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!