Jalgaon News | जळगावमध्ये आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल! विजय चौधरी आणि महिला लोकप्रतिनिधी यांच्यातील संभाषण


जळगाव मध्ये आणखी एक ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे, या क्लिपमध्ये विजय चौधरी आणि महिला लोकप्रतिनिधी यांच्यातील संभाषण आहे.

विजय चौधरी ची आणखी एक ऑडिओ क्लिप वायरल

विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप्समुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक (पूर्वी प्रदेश महामंत्रीही) विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा केला जात आहे.

यात रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणीही केल्याचे सांगितले जाते.

या दरम्यान मंत्री रक्षा खडसे यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून या प्रकरणाची चर्चा राजकीय पातळीवरही रंगली आहे.

माझी खासदार बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

याशिवाय विजय चौधरी यांच्या इतर कथित क्लिप्समध्ये माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबतही आक्षेपार्ह व जातीवाचक स्वरूपाचे वक्तव्य असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नंदुरबार पोलिसांनी एससी/एसटी अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

विजय चौधरी यांनी क्लिप्स एआय-जनरेटेड (कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून बनावट) असल्याचा दावा करत पक्षातील पदाचा राजीनामा दिला.

विजय चौधरी च्या आवाजाची तपासणी होणार

७ ऑगस्ट २०२६ रोजी नंदुरबार पोलिसांनी चौधरी यांना अटक केली. त्यांच्या आवाजाच्या नमुन्याची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. सत्यता अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नाही.

या दरम्यान रक्षा खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रावेर, मुक्ताईनगर येथे निषेध मोर्चे काढण्यात आले असून लेवा समाजातील संघटनांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

नव्या क्लिप मध्ये नेमके आहे काय?

आता चौधरी आणि भाजपच्या एका महिला लोकप्रतिनिधी यांच्यातील दुसरी कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यात लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षातील एका पदाधिकाऱ्याने १५ लाख रुपये स्वीकारूनही काम न केल्याचा आरोप असल्याचे दावा केला जात आहे.

ही क्लिप निवडणुकीच्या काळातील असल्याचे सांगितले जात असले, तरी ती सध्या प्रसारित होत असल्याने चर्चांना वेग आला आहे.

चौधरी यांच्या या सर्व कथित क्लिप्समुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद, स्थानिक नाराजी आणि निवडणुकीतील घडामोडींबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

विरोधक प्रतिक्रिया देत असताना सत्ताधारी पक्षातील काही नेते सावध भूमिका घेत आहेत.

मात्र कोणत्याही क्लिपची अधिकृत पुष्टी किंवा तपास यंत्रणेकडून सत्यता अद्याप समोर आलेली नाही. फॉरेन्सिक तपास आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट चित्र दिसेल.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!