Jalgaon News | भाजपा महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह भाषा, विजय चाैधरींंना अटक


भाजपा चे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. विजय चौधरीला अटक करण्यात आली आहे.

भाजपा चे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी वर कारवाई

विजय चाैधरी माजी खासदार हिना गावित यांच्याबद्दलही आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसले. आता विजय चाैधरींला थेट अटक करण्यात आली.

भाजपा चे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्याविरोधात डॉ. हिना गावित यांच्याबाबतच्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्यांना अटक करण्यात आली असून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील  ऑडिओ क्लिप व्हायरल

काही दिवसांपूर्वी विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तसेच एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाष्य व अपशब्द वापरल्याचे समोर आले.

विजय चौधरी यांनी शिवीगाळ केल्याचे दिसून आले, तर गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप केल्याचे किंवा ते अयोग्य असल्याचे नमूद केल्याचे आढळले नाही. या क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

त्याचबरोबर डॉ. हिना गावित यांच्याबाबतही आक्षेपार्ह भाष्य असलेली आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.

यामुळे नंदुरबारच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. रक्षा खडसे यांच्याबाबतच्या क्लिपनंतर त्यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नसली, तरी गावित कुटुंबीयांनी विजय चौधरी यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली.

माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाकडून हा गुन्हा दाखल

माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्री उशिरा वैद्यकीय तपासणीनंतर विजय चौधरी यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले.

आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता आहे.

चौकशीत आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस प्रशासन सतर्क असून तपास वेगाने सुरू ठेवण्यात आला आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!