Pune Global Education : ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2026’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’ ला पुण्यातील रॉयल कॉनॉट बोट क्लब येथे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,शैक्षणिक तज्ज्ञांशी संवाद

पुणे : परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी स्मार्ट’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’ ला पुण्यातील रॉयल कॉनॉट बोट क्लब येथे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिक्षण मेळाव्यात युके, युएसए, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि दुबई येथील ६० हून अधिक नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक तज्ज्ञांशी संवाद साधून मार्गदर्शन मिळवण्याची उत्तम संधी मिळाली.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांनी घेतली शैक्षणिक पर्याय यांची माहिती

या मेळाव्यात पुणे व परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परदेशी शिक्षणासंदर्भातील विविध पर्यायांची माहिती घेतली.

विशेष म्हणजे, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांना या ठिकाणी पूर्णपणे मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते.

परदेशात शिक्षण घेण्याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न व शंका असतात.

या पार्श्वभूमीवर, योग्य देश व विद्यापीठाची निवड कशी करावी, शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया, उपलब्ध शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) तसेच प्रवेश प्रक्रिया यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मेळाव्यात सविस्तर समुपदेशन करण्यात आले. यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले.

विद्यार्थ्यांना मिळाली स्पष्ट दिशा : चेतन जैन

‘स्टडी स्मार्ट’चे संचालक चेतन जैन यांनी सांगितले की, “या फेअरमुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील जागतिक शिक्षणाच्या संधींबाबत एक स्पष्ट दिशा मिळाली आहे.

यंदाच्या फेअरमध्ये ८५० हून अधिक विद्यार्थी आणि १,२०० हून अधिक पालकांनी सहभाग नोंदवत या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.”

तसेच, आतापर्यंत १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून परदेशातील नामांकित विद्यापीठांची निवड केली असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!