श्री भगवान वराह जयंतीनिमित्त सकल हिंदू समाज, पुणे यांच्या वतीने १३ सप्टेंबर २०२६ (रविवार) रोजी पुण्यात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
भगवान वराह जयंतीनिमित्त मिरवणुकीतून पर्यावरणाचा संदेश
पुणे: श्री वराह जयंतीनिमित्त सकल हिंदू समाज, पुणे यांच्या वतीने १३ सप्टेंबर २०२६ (रविवार) रोजी पुण्यात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मिरवणूक सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत कस्तुरे चौक ते श्री बालाजी मंदिर, भवानी पेठ या मार्गावर काढण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत दिली माहिती
सामाजिक व राजकीय विश्लेषक सर्वेश मेहेंदळे आणि ‘युवा शेतकरी संघ, महाराष्ट्र राज्य’चे संस्थापक अध्यक्ष रोहिदास बापू चोरघे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भगवान विष्णूंच्या वराह अवताराने हिरण्याक्षाच्या तावडीतून पृथ्वीला सोडवून तिचे रक्षण केले होते, अशी पौराणिक कथा आहे.
याच पार्श्वभूमीवर, या वराह जयंतीच्या माध्यमातून पृथ्वी संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि भूमीचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.
सध्याच्या काळातील वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) यांसारख्या गंभीर संकटांकडे या सोहळ्याच्या निमित्ताने लक्ष वेधण्यात आले आहे.
पृथ्वीचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, नागरिकांनी भूमी संवर्धन आणि सेंद्रिय शेतीचा संकल्प करावा, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.









