Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात पुण्यात दारूविक्री बंदीचा निर्णय सुधारित; हायकोर्टाच्या फटकार्‍यानंतर १२ दिवसांची बंदी मागे


गणेशोत्सवात पुण्यात दारूविक्री बंदीचा निर्णय  दुरुस्त करण्यात आला असून, हायकोर्टाच्या फटकार्‍यानंतर १२ दिवसांची बंदी मागे घेण्यात आला आहे.

गणेशोत्सवात पुण्यात दारूविक्री बंदीचा निर्णय, हाय कोर्टाने फटकारले

पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात लागू करण्यात आलेली १२ दिवसांची सरसकट दारूविक्री बंदी जिल्हा प्रशासनाने मागे घेतली आहे.

पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या या अवाजवी निर्बंधांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत फटकारल्यामुळे प्रशासनाला हा निर्णय बदलावा लागला आहे. आता सलग १२ दिवस दुकाने बंद न राहता, केवळ ठराविक मुख्य दिवशीच शहरात मद्यविक्रीवर निर्बंध असतील.

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी मद्यविक्रीबाबतचे सुधारित आदेश जारी केले आहेत.

नवीन नियमांनुसार कधी आणि कुठे असेल बंदी?

  • १४ सप्टेंबर (गणेश चतुर्थी): उत्सवाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सरसकट १२ दिवस बंदी नसून, सुधारित निर्णयानुसार या दिवशी केवळ दुपारी ४ वाजेपर्यंतच दारूविक्री बंद राहील, त्यानंतर दुकाने उघडी ठेवता येतील.
  • २५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी): मुख्य विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण पुणे शहरात कडक ‘ड्राय डे’ (पूर्ण दारूबंदी) पाळला जाईल.
  • २६ सप्टेंबर (विसर्जन मिरवणूक): मानाच्या आणि प्रमुख गणपतींच्या विसर्जन मिरवणुका दुसऱ्या दिवशीही सुरू राहत असल्याने, मिरवणूक मार्ग आणि लगतच्या परिसरात मिरवणुका पूर्णपणे शांततेत संपेपर्यंत दारूबंदी कायम राहणार आहे.
  • ५ व्या आणि ७ व्या दिवशी: घरगुती व लहान मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणाऱ्या ठराविक मार्गांवर आणि लगतच्या परिसरातील परमिट रूम्स, बिअर बार आणि दारूची दुकाने विसर्जनादरम्यान बंद राहतील.

हायकोर्टाने का दाखवला लाल कंदील?

पुणे जिल्हा प्रशासनाने आधी खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग १२ दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला होता.

या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली असता, मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला विचारले की, “केवळ पुणे जिल्ह्यालाच असे का लक्ष्य केले जात आहे? मद्यपान करणारी प्रत्येक व्यक्ती कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल असे नाही”.

कोर्टाच्या या कडक भूमिकेनंतर जिल्हा प्रशासनाने जुना आदेश रद्द करून नवीन नियमावली जाहीर केली.

दरम्यान, उत्सवाच्या काळात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी सर्व बार मालक आणि दुकानदारांना कडक सूचना दिल्या आहेत.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!