Tahasildar Suspend | अवैध वाळू उपसा प्रकरणी अमळनेरचे तहसीलदार निलंबित


नियमबाह्य आणि बेसुमार वाळू उपसा प्रकरणी चौकशी अहवालानंतर अमळनेरच्या तहसीलदार निलंबित करण्यात आले आहे.

चौकशी अहवालाच्या आधारे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा निलंबित

अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील वाळू घाटावर मशीनच्या मदतीने नियमबाह्य आणि बेसुमार वाळू उपसा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणातील चौकशी अहवालाच्या आधारे शासनाने अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना निलंबित केले आहे.

निलंबनाचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून आणखी एका तहसीलदार वरही कारवाई प्रस्तावित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

प्रशासनाने गांभीर्याने घेतले प्रकरण

सावखेडा वाळू घाटावरील अवैध उपशानंतर जबाबदारी निश्चित करण्यासाठी कारवाई सुरू झाली.

यातून प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिल्याचे स्पष्ट झाले.

परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा करण्यास मोकळीक देणे किंवा त्यावर प्रभावी नियंत्रण न ठेवणे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी चौकशीतून निश्चित करण्यात आली.

सुरुवातीला मंडळाधिकारी आणि तलाठ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर चौकशी अहवाल शासनाकडे गेल्यानंतर वरही निलंबनाची कारवाई झाली.

त्यामुळे सावखेडा येथील अवैध वाळू उपशाचे प्रकरण आता महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.

अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांवर अधिक जबाबदारी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चोपडा येथील  तहसीलदारांवर प्रस्तावित कारवाईकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!