आनंदी जीवनाचा मार्ग उलगडणाऱ्या तेज ज्ञान फाउंडेशन च्या सरश्रींच्या ‘आओ साक्षी रहना सीखें’ या विनामूल्य कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तेज ज्ञान फाउंडेशन चा आओ साक्षी रहना सीखें कार्यक्रम
पुणे : तेज ज्ञान फाउंडेशन चे संस्थापक सरश्री यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आओ साक्षी रहना सीखें How to Stay Joyful’ हा विशेष लाइव्ह उपक्रम रविवार, 16 ऑगस्ट दुपारी 1 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम मनन आश्रम, सर्व्हे क्र. 43, सनस नगर, नांदोशी, किरकटवाडी फाटा, सिंहगड रोड, पुणे येथे होणार असून सहभाग पूर्णपणे विनामूल्य आहे.
फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब या ऑनलाइन माध्यमातूनही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

सरश्री करणार मार्गदर्शन
या कार्यक्रमात सरश्री आनंदी आणि प्रसन्न राहण्याची कला, जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा साक्षीभावाने स्वीकार करण्याची दृष्टी, मनावरील ताण कमी करून अंतर्मनात शांतता अनुभवण्याचे मार्ग आणि परिस्थिती बदलली नाही तरी आनंदी कसे राहता येते, याविषयी सोप्या व प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत.
दैनंदिन जीवनात सकारात्मकता, आत्मिक शांतता आणि अंतर्मनातील स्थैर्य अनुभवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेजज्ञान फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.









