Pune Medical News: बुलडाण्यात ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न; राज्यभरातून शेकडो तज्ञांची उपस्थिती!


निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ सोहळा रविवारी स्थानिक भातृमंडळ हॉलमध्ये अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : बुलडाणा येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए जी एम ए आणि योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ सोहळा रविवारी स्थानिक भातृमंडळ हॉलमध्ये अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

निसर्गोपचार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो निसर्गोपचार तज्ञ व वैद्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भव्य सोहळ्याचे उद्घाटन व प्रमुख उपस्थिती बुलडाणा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ गायकवाड आणि बुलडाणा नगर पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई गायकवाड यांच्या हस्ते झाली.

तसेच मंचावर प्रामुख्याने डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदीप गुहा, डॉ. प्रशांत कपाले आणि एम जी एम विद्यापीठाचे योगा विभाग प्रमुख गंगाप्रसाद खरात हे उपस्थित होते.

निसर्गोपचार
निसर्गोपचार सोहळ्याला उपस्थित मान्यवर

नितीनराजे पाटील यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन नितीनराजे पाटील हे होते. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि अत्यंत मार्गदर्शक विचारांनी उपस्थित सर्व डॉक्टरांना आणि निसर्गोपचार तज्ञांना प्रेरित केले.

देशभरातील चळवळीला अधिक गती देणे, तसेच दुर्गम भागातील वैद्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे यांमध्ये नितीनराजे पाटील यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केला.

राज्यातील मान्यवरांची उपस्थिती

या दिमाखदार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आणि मार्गदर्शनासाठी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, सौ. दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, विनोद ढोबळे, रावसाहेब घोडेगाव, रामेश्वर शिंदे, श्रीकांत अंजुटगी, भानुदास परबत, अशोक देवकर, संजय गवारे, सौ. स्मिता खारकर,  राहुल देशमुख, आशिष सूर्यवंशी यांच्यासह असोसिएशनचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यामुळे महाराष्ट्रातील क्षेत्राला एक नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली असून, आरोग्य क्षेत्रात निसर्गोपचाराचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या प्रसंगी सर्व उपस्थितांनी केला.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!