गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
स्वारगेट, डेक्कन परिसरातील वाहतूक बंद
पुणे: पुण्यात शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक आणि डेक्कन चौक परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने, पीएमपीएमएल (PMPML) प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख बस स्थानकांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे.
शहरातील शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कर्वे रोड हे प्रमुख रस्ते बस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील.
त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या मार्गावरील बस नेमकी कोठून सुटणार आहे, याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
स्वारगेट परिसरातील बसचे नवीन नियोजन:
स्वारगेट भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी इच्छित मार्गानुसार खालीलप्रमाणे तीन तात्पुरती ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत:
- लक्ष्मी नारायण चौक: शाहू महाराज बसस्थानकातून सातारा रोडमार्गे कात्रज, कोंढवा, अप्पर आणि मार्केट यार्डकडे जाणाऱ्या सर्व बस येथून सुटतील.
- स्वामी समर्थ मठ (पर्वती पायथा): नटराज बसस्थानकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या बस या थांब्यावरून उपलब्ध होतील.
- वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ): सोलापूर रोडमार्गे पुलगेट व हडपसरकडे जाणाऱ्या, तसेच भवानी पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेकडे जाणाऱ्या बस येथून सुटतील.
डेक्कन जिमखाना परिसरातील बसचे नवीन नियोजन:
एसएनडीटी कॉलेजजवळ (SNDT): डेक्कन जिमखाना बसस्थानकातून कोथरूड डेपो, माळवाडी आणि एनडीए (NDA) गेटकडे जाणाऱ्या बस नेहमीच्या स्थानकाऐवजी आता एसएनडीटी कॉलेजजवळून सुटतील.
मिरवणुकीनुसार शहरातील मुख्य वाहतूक ‘या’ चौकातून वळवणार:
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रगतीनुसार खालील प्रमुख चौकांमध्ये सर्वसामान्य वाहतूक वळविण्यात (Diversion) येणार आहे:
मुख्य रस्ता आणि वाहतूक वळवण्याचे ठिकाण
- जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक
- शिवाजी रस्ता, काकासाहेब गाडगीळ पुतळा
- मुदलियार रस्ता, अपोलो टॉकीज – दारूवाला पूल
- लक्ष्मी रस्ता, संत कबीर पोलिस चौकी
- सोलापूर रस्ता, ढोले चौक
- सातारा रस्ता, व्होल्गा चौक
- बाजीराव रस्ता, सावरकर पुतळा चौक
- लालबहादूर शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलिस चौकी
- कर्वे रस्ता, नळस्टॉप
- फर्ग्युसन कॉलेज (FC) रस्ता, गोपाळकृष्ण गोखले चौक
पीएमपी प्रशासनाचे आवाहन: विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत परिस्थितीनुसार हे बदल लागू राहतील. प्रवाशांनी या तात्पुरत्या व्यवस्थेला सहकार्य करून आपली गैरसोय टाळावी.









