बोरसुरी गावातून पुण्यात स्थायिक झालेल्या बोरसुरीकर परिवाराच्या वतीने भव्य ‘सामुहिक रक्षाबंधन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
बोरसुरी गावातून पुण्यात स्थायिक झालेल्या परिवाराचे ‘सामुहिक रक्षाबंधन’
पुणे -: धावपळीच्या युगात एकत्र कुटुंब पद्धतीची संस्कृती जपत, एकमेकांविषयीचे प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बोरसुरी गावातून पुण्यात स्थायिक झालेल्या बोरसुरीकर परिवाराच्या वतीने एका भव्य ‘सामुहिक रक्षाबंधन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा कौतुकास्पद सोहळा रविवार, ३० ऑगस्ट रोजी भोसरी येथील ‘रोशन गार्डन रेस्टॉरंट’ मध्ये अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सण-उत्सवांच्या निमित्तानेही सर्वांना एकत्र येणे कठीण होते.
हीच अडचण ओळखून, संपूर्ण बोरसुरीकर कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी आणि भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा गोडवा वाढवण्यासाठी या विशेष स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

आनंदाचा रंगला स्नेह मेळावा
श्री विश्वकर्मा प्रसन्न यांच्या आशीर्वादाने आयोजित या मंगलमयी सोहळ्यात केवळ राखी बांधण्याचा सणच साजरा झाला नाही, तर संपूर्ण बोरसुरीकर कुटुंबाचा एक अविस्मरणीय स्नेहमेळावा पाहायला मिळाला.
जुन्या आठवणींना उजाळा देणे, सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर करणे आणि एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थित सर्वांनीच यावेळी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.
या भव्य सोहळ्याचे संपूर्ण नियोजन अमित पंडित, शशिकांत पोतदार, राम पोतदार आणि दत्तात्रय पोतदार यांनी केले होते.
तर संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भगवान पोतदार यांनी करून कार्यक्रमात रंगत आणली.








