Pune Crime News | बिबवेवाडी स्मशानभूमीत तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; पाठलाग करुन आठ तासात चार आरोपी अटकेत


बिबवेवाडी स्मशानभूमीत तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; पाठलाग करुन आठ तासात चार आरोपीना अटक करण्यात आली आहे.

तरुणावर ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला, धायरी परिसरातून आरोपींना अटक

पुणे : बिबवेवाडी स्मशानभूमी परिसरात एका तरुणावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी धारदार हत्याराने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी धायरी परिसरातून अटक केली आहे.

फिर्यादी आणि त्यांचा मामाचा मुलगा बिबवेवाडी स्मशानभूमी येथे उभे असताना काही इसमांनी त्यांच्या मामाच्या मुलावर हल्ला केला.

आरोपींनी त्याच्या डोक्यात लोखंडी धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

धायरी परिसरातील लॉज आणि मंदिरांची तपासणी

गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार २१ ऑगस्ट २०२६ रोजी तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.

आरोपी दोन मोटारसायकलींवरून वेगवेगळ्या मार्गाने धायरीच्या दिशेने गेल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याची तीन तपास पथके तयार करून धायरी परिसरातील लॉज आणि मंदिरांची तपासणी करण्यात आली.

पाठलाग करून आरोपींना पकडले

दरम्यान, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, शिवाजी येवले आणि सुमित ताकपेरे यांना आरोपी धायरेश्वर मंदिर, धायरी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या आदेशाने पोलिसांनी परिसरात कारवाई केली.

२२ ऑगस्ट रोजी पहाटे पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून धायरेश्वर मंदिर परिसरातून चौघांना ताब्यात घेतले.

त्यांची नावे प्रदीप पिंटू कश्यप (वय १९), मयूर रोहिदास चव्हाण (वय २०), तेजस सोमनाथ आंबुरे उर्फ भोला (वय २६) आणि शरद पिंटू चव्हाण (वय २२) अशी आहेत. चौकशीत त्यांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर चौघांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.

पोलिसांची दमदार कामगिरी

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शसुरज बेंद्रे यांच्या सूचनांनुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तसेच पोलीस अंमलदार संजय गायकवाड, अय्याज दड्डीकर, संजीव कळंबे, दत्ता शेंद्रे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, सुमित ताकपेरे आणि रक्षित काळे यांनी ही कारवाई केली.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!