Pune News | पुणे शहर, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन गुन्हेगारांना मार्केटयार्ड पोलीस पथकाने जेरबंद केले


पुणे शहर :खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन गुन्हेगारांना मार्केटयार्ड पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. जुना राग मनात धरून हा हल्ला झाला होता.

पुणे शहर धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केले

दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांना दिनांक २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जुना राग मनात धरून साईबाबा मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर, आंबेडकर नगर, मार्केटयार्ड, पुणे शहर येथे आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केले होते.

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे दिनांक २७/०७/२०२६ रोजी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर भागात सापळा रचला

या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे तपास पथक तात्काळ सक्रिय झाले.

दिनांक २८ रोजी पहाटे माहिती मिळाली की, दोन्ही आरोपी पुणे शहर सोडून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार तपास पथकाने हडपसर भागात सापळा रचला.

अटक करण्यात आलेले आरोपी:

  •  आरमान समीर शेख, वय २० वर्षे, रा. आंबेडकर नगर, गल्ली नं. १३, मार्केटयार्ड, पुणे.
  • शाहरुख शेख, वय २४ वर्षे, रा. आंबेडकर नगर, गल्ली नं. १५, मार्केटयार्ड, पुणे.

दिनांक २८/०७/२०२६ रोजी पहाटे ४.०० वाजता हडपसर येथून दोन्ही आरोपींना यशस्वीरीत्या ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी

पोलीस उप-निरीक्षक अक्षयकुमार गडगडे, श्रेणी पोलीस उप-निरीक्षक सुनिल भापकर, राजेश थोरात, महेश जेधे, कौस्तुभ जाधव, दत्तात्रय राऊत, बालाजी शिंदे, दिनेश माने. गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक बसवराज माळी हे करत आहेत.

ही कारवाई  अमितेश कुमार, सा. पोलीस आयुक्त, संजय दराडे, सा. सह पोलीस आयुक्त, राजेश बनसोडे, सा. अपर पोलीस आयुक्त, मिलिंद मोहिते, सा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०२, आणि राहुल आवारे, सा. सहा. पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत जगताप व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुनिता नवले यांच्या आदेशानुसार पार पडली. असे विश्वजीत जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मार्केटयार्ड, पुणे शहर यांनी सागितले.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!