विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एका अट्टल आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून अटक केली आहे.
शिताफीने सापळा रचून पोलिसांनी केली अटक
पुणे: मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या फेसबुकवरील माहितीनुसार हद्दीत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एका अट्टल आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून अटक केली आहे.
बालाजी उर्फ यश कुंडलीक गायकवाड (वय २७ वर्षे, रा. आनंद नगर वसाहत, मार्केट यार्ड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीवर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात NDPS (अमली पदार्थ विरोधी कायदा) कलम ८(क), २२(क), महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ड), भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक १६५/२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
ही धडक कारवाई मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनीता नवले आणि पोलीस उपनिरीक्षक गडगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड तपास पथकाने (DB Team) केली.
अशी केली अटक
आरोपीचा शोध घेण्यासाठी मार्केटयार्ड तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.
या पथकातील पोलीस हवालदार महिबुब नदाफ, महेश जेधे, दत्तात्रय राऊत, कौस्तुभ जाधव, राजेश थोरात, नितेश जाधव, गोरखनाथ चिनके, पोलीस अंमलदार बालाजी शिंदे, दिनेश माने आणि पोलीस शिपाई संदीप सूर्यवंशी यांनी आरोपीच्या ठावठिकाण्यावर पाळत ठेवली.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.
या कामगिरीत लोणीकंद पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे पोलीस हवालदार स्वप्निल जाधव आणि पोलीस अंमलदार मल्हारी सपुरे यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.








