आकुर्डी येथून २८ मार्च २०२६ रोजी घराबाहेर पडलेल्या ५३ वर्षीय वैशाली विवेक देशमुख या संशयास्पद रित्या बेपत्ता झाल्या आहेत.
आकुर्डी येथील वैशाली देशमुख बेपत्ता
पुणे: आकुर्डी येथून २८ मार्च २०२६ रोजी घराबाहेर पडलेल्या ५३ वर्षीय वैशाली विवेक देशमुख या संशयास्पद रित्या बेपत्ता झाल्या आहेत.
त्या घरातून निघाल्यानंतर साताऱ्यातील प्रसिद्ध यवतेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचे त्यांनी फोनवर सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अधिकृतपणे बेपत्ता (मिसिंग) असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
‘महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप’चे अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली.
वैशाली देशमुख यांच्याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्यांचे पती विवेक देशमुख यांनी देशमुख यांचा शोध लावणाऱ्यास किंवा त्यांच्याबद्दल अचूक माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
बेपत्ता महिलेची माहिती
- नाव: वैशाली विवेक देशमुख
- वय: ५३ वर्षे
- राहणार: आकुर्डी, पुणे
- बेपत्ता झाल्याची तारीख: २८ मार्च २०२६
- संभाव्य ठिकाण: यवतेश्वर महादेव मंदिर परिसर, सातारा
संपर्क साधण्याचे आवाहन
देशमुख यांच्याबाबत कोणालाही काहीही माहिती मिळाल्यास, किंवा त्या कुठे दिसून आल्यास तातडीने 9326425858 या क्रमांकावर अथवा निगडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन देशमुख कुटुंबिय आणि शिवाभाऊ पासलकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.








