Pune Accident : पाषाण-बावधन रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या आयटी इंजिनिअरला भरधाव कारची धडक


नेकलेस गार्डनजवळ सकाळी धावत (जॉगिंग) असलेल्या एका उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरला भरधाव कारने जोरदार धडक दिली.

भरधाव कारने पहाटेच्या वेळी दिली इंजिनिअरला धडक

पुणे: आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डनजवळ सकाळी धावत (जॉगिंग) असलेल्या एका उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरला भरधाव कारने जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, यातच त्या तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. विरेंद्र द्विवेदी असे मृत्यू झालेल्या ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चतुःशृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नेकलेस गार्डनजवळ झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र द्विवेदी हे नेहमीप्रमाणे सकाळी पाषाण-बावधन रोडवरील नेकलेस गार्डन परिसरात व्यायाम आणि जॉगिंग करत होते.

त्याच वेळी मागून आलेल्या एका भरधाव कारने त्यांना थेट उडवले. अपघात झाल्यानंतर विरेंद्र यांना तातडीने त्याच कारमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

कार उद्योजकाशी संबंधित; आरोपी विद्यार्थ्याला अटक

तपासादरम्यान पोलिसांना या अपघातग्रस्त कारबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. अपघात झालेली कार ही ‘ब्लूरेज डेव्हलपर्स’ या नामांकित कंपनीच्या नावावर नोंदणीकृत असून, तिचा अधिकृत पत्ता ‘अबिल हाऊस’ (ABIL House) येथील आहे.

या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी ईशान शेठिया या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ईशान हा बीबीए (BBA) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी असून तो पुण्यात हॉस्टेलमध्ये राहतो.

त्याचे वडील याच कंपनीत लीगल ॲडव्हायझर (कायदेशीर सल्लागार) म्हणून कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ईशान रविवारी सकाळी काही साहित्य आणण्यासाठी गाडी घेऊन बाहेर पडला होता आणि त्याच वेळी हा अपघात घडला.

अपघात झाल्यानंतर पळून न जाता ईशान स्वतः विरेंद्र यांना रुग्णालयात घेऊन गेला होता. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस पुढील तपास करत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!