Jalgaon Crime News | गणेशोत्सवापूर्वी पोलीस कारवाई – सराईत गुन्हेगार तन्वा शेख येरवडा कारागृहात स्थानबद्ध


आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलीस कारवाई चे सत्र सुरू केले आहे.

पोलीस कारवाई तन्वीर ऊर्फ तन्वा हिंसक प्रवृत्तीचा गुन्हेगार

जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील अत्यंत धोकादायक व सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्वा रहीम शेख (वय २१, रा. नूरानी मशिदीजवळ, गेंदालाल मिल, जळगाव) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यांतर्गत कारवाई करत त्याला थेट पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी याबाबतचे अंतिम आदेश दिले.

स्थानबद्ध करण्यात आलेला तन्वीर ऊर्फ तन्वा हा अत्यंत हिंसक प्रवृत्तीचा गुन्हेगार आहे.

जळगाव शहर पोलीस ठाण्यात 11 गंभीर गुन्हे दाखल

  • – ०२ जबरी चोरी
  • – ०१ सरकारी नोकरावर हल्ला
  • – ०४ प्राणघातक/गंभीर दुखापत
  • – ०१ दुखापतीसह दंगा (रायट)
  • – ०१ घरफोडी व आगळीक
  • – ०१ बेकायदेशीर शस्त्रास्त्र कायदा (आर्म्स अॅक्ट)

याशिवाय त्याच्यावर 13 अदखलपात्र गुन्हेही दाखल

तन्वा शेख याच्या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी अनेकदा प्रतिबंधक कारवाया केल्या होत्या. 25 ऑगस्ट 2025 रोजी त्याच्याकडून फायनल बाँड घेण्यात आला होता.

तसेच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार (दि. 23 जानेवारी 2026) त्याला 3 महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

मात्र तरीही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही आणि तो सातत्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत गुन्हे करीतच राहिला.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावाची गंभीर दखल घेत दिला आदेश

गुन्हेगाराच्या वाढत्या विघातक कृत्यांमुळे जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून 11 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) सोपवला.

एलसीबीमार्फत हा प्रस्ताव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सादर करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावाची गंभीर दखल घेत आदेश (क्र. दंडप्र कावि/एमपीडीए/०४/२०२६) पारित करून आरोपीला येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले.

पोलीस पथकाची यशस्वी कारवाई

पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, मुख्य पोलीस उपनिरीक्षक भांडारकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील, अमोल ठाकूर, प्रणय पवार, राहुल पांचाळ, दीपक पाटील व दिनेश कंखरे यांच्या पथकाने १४ ऑगस्ट रोजी आरोपी तन्वा शेख याला ताब्यात घेऊन थेट पुण्याच्या येरवडा कारागृहात रवाना केले.

ही विशेष पोलीस कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील दामोदरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयंत चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक शेख आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप चव्हाण यांनी पार पाडली.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!