Jalgaon Crime News | जळगावात मीरा-भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई; 1 कोटीचे 4 किलो 191 ग्रॅम एमडी जप्त, दोघांना अटक


मीरा-भाईंदर पोलिसांनी जळगावात मोठी कारवाई करत तब्बल 4 किलो 191 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला आहे.

पोलिसांनी जळगावात जप्त केले 1 कोटीचे 4 किलो 191 ग्रॅम एमडी जप्त

जळगाव : मीरा-भाईंदर पोलिसांनी जळगावात मोठी कारवाई करत तब्बल 4 किलो 191 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला आहे.

जप्त करण्यात आलेल्या एमडीची अंदाजे बाजारातील किंमत 1 कोटी 22 लाख 77 हजार 500 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणामुळे जळगावात पुन्हा एकदा अमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

रामनगर येथून दोघांना घेतले ताब्यात

मीरा-भाईंदर परिसरातील एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना मीरा-भाईंदर पोलिसांचे पथक गुरुवारी जळगावात दाखल झाले होते.

या कारवाईवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारीही उपस्थित होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पथकाने मेहरूण परिसरातील रामनगर येथून रहीम ताहीर पिंजारी याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवाजीनगर परिसरातील उसनिया पार्क येथे कारवाई केली.

या ठिकाणी सय्यद मुशादूर अली मुमताज अली (२९) याला ताब्यात घेण्यात आले.

अमली पदार्थांच्या नेटवर्कबाबत महत्त्वाचे धागेदोरे

पोलिसांनी केलेल्या झडतीदरम्यान त्याच्याकडून तब्बल 4 किलो 191 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली.

या अमली पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल 1 कोटी 22 लाख 77 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

परजिल्ह्यातील पोलिसांनी जळगावात येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा शोधून काढल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मात्र, या कारवाईमुळे जळगावातील अमली पदार्थांच्या नेटवर्कबाबत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, जप्त करण्यात आलेला एमडी नेमका कुठून आणण्यात आला होता, तो कोणाला पुरवला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे.

याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. जळगावात झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!