Pune News : पुण्यात थरार: कात्रजमध्ये भररस्त्यात तरुणी च्या अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी चोप देत उत्तर प्रदेशातील तरुणाला केले पोलिसांच्या स्वाधीन


सुखसागरनगर भागात मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या एका १८ वर्षीय तरुणी ची भररस्त्यात छेड काढत तिच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला.

तरुणी ची भररस्त्यात छेड काढत अपहरणाचा प्रयत्न

पुणे: पुण्यातील कात्रज परिसरात एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. सुखसागरनगर भागात मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या एका १८ वर्षीय तरुणीची भररस्त्यात छेड काढत तिच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

स्थानिक नागरिकांनी छेड काढणाऱ्या नराधमाला रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी या प्रकरणी उत्तर प्रदेशातील एका तरुणाला अटक केली आहे.

मैत्रिणीला भेटायला आली अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १८ वर्षीय तरुणी कात्रजमधील सुखसागरनगर भागात राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती.

ती रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने तिला एकटे पाहून तिची छेड काढण्यास सुरुवात केली.

तरुणीने त्याला विरोध केला असता, आरोपीची हिंमत आणखी वाढली. त्याने भररस्त्यात सर्वांसमोर तिला जबरदस्तीने ओढत नेत तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

या अनपेक्षित प्रकारामुळे भयभीत झालेल्या तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

नागरिकांची सतर्कता आणि धाडस

तरुणीचा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक आणि पादचारी तातडीने तिच्या मदतीसाठी धावून आले.

नागरिकांना आपल्या दिशेने येताना पाहून आरोपीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थितांनी त्याला चहूबाजूंनी घेरून जागीच पकडले.

भररस्त्यात मुलीसोबत चाललेले कृत्य पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.

आरोपी मुळचा उत्तर प्रदेशचा

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून तो पुण्यात वास्तव्यास होता.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध छेडछाड आणि अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या घटनेमुळे कात्रज आणि सुखसागरनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तरुणीची सुरक्षित सुटका झाली असली, तरी पुण्यासारख्या शहरात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!