Baramati Doctor Molestation Case: बारामतीत खळबळ: तपासणीदरम्यान महिला रुग्णाचा विनयभंग, खलाटे हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल


खलाटे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. राधेय खलाटे यांच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती मध्ये डॉक्टर विरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा

बारामती: शहरातील एका नामांकित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात तपासणी आणि उपचाराच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी खलाटे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. राधेय खलाटे यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात तीव्र खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

तक्रारदार महिला १९ ऑक्टोबर रोजी पोटदुखीच्या त्रासामुळे उपचारासाठी खलाटे मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात गेली होती.

रुग्णालयात तिला सलाईन लावण्यात आले होते. त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास डॉ. राधेय खलाटे यांनी पीडित महिलेला तपासणीसाठी आपल्या केबिनमध्ये बोलावले. यावेळी महिलेसोबत तिचा लहान मुलगाही उपस्थित होता.

केबिनमध्ये डॉक्टर खलाटे यांनी सुरुवातीला महिलेचा रक्तदाब (बीपी) आणि हृदयाचे ठोके तपासले.

त्यानंतर त्यांनी महिलेला पाठीशी संबंधित काही व्यायाम करण्यास सांगितले. व्यायाम करत असताना डॉक्टरांनी वारंवार जवळ येण्याचा प्रयत्न केला.

महिलेने अंतर ठेवण्यास सांगूनही डॉक्टरांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले.

इतकेच नव्हे तर, व्यायाम करत असताना डॉक्टरांनी तिच्या कमरेला अयोग्य स्पर्श केला आणि ‘छातीत धडधड होतेय का?’ अशी विचारणा केली, असा गंभीर आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे.

या प्रकारामुळे प्रचंड अस्वस्थ झालेल्या महिलेने पुढील व्यायाम करण्यास नकार दिला आणि औषधे घेऊन ती तातडीने घरी परतली.

व्हॉट्सॲप मेसेज आणि माफीनामा

या धक्कादायक प्रकारामुळे महिला प्रचंड मानसिक तणावाखाली होती.

दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या निमित्ताने डॉ. खलाटे यांनी या महिलेला व्हॉट्सॲपवर शुभेच्छा संदेश पाठवला. त्यावर महिलेने त्यांना आधी रुग्णालयात केलेल्या अयोग्य वर्तनाबद्दल जाब विचारला.

यावर डॉ. खलाटे यांनी आपल्या चुकीची माफी मागत, ‘पुन्हा असे होणार नाही’ असा मेसेज पाठवल्याचा दावा पीडितेने केला आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल

पीडित महिलेचा पती बारामती येथे आल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी पीडितेने बारामती शहर पोलीस ठाणे गाठून अधिकृत तक्रार नोंदवली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ. राधेय खलाटे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप करत असून, पोलीस व्हॉट्सॲप चॅट आणि इतर पुराव्यांची पडताळणी करत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!