Pune Crime News | पुण्यात २५ लाखांचे मेफेड्रॉन जप्त; मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई


पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे.

मार्केटयार्ड पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २५ लाखाचे मेफेड्रॉन केले जप्त

पुणे : पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाई ला मोठे यश मिळाले आहे. मार्केटयार्ड पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २५ लाख रुपये किमतीचे १२५ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले आहे.

यासोबतच देशी-विदेशी दारू, तलवार, कुऱ्हाड, लोखंडी पाइप, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि रोख रक्कम असा एकूण २५ लाख १८ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महिबुब नदाफ हे अंमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.

यश कुंडलीक गायकवाड आणि त्याचा भाऊ ओम कुंडलीक गायकवाड हे आनंदनगर वसाहत, मार्केटयार्ड, पुणे येथील सार्वजनिक शौचालयाजवळील गल्लीत असलेल्या घरातून अवैध दारू तसेच अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

पुणे पोलिसांची कारवाई
पुणे पोलिसांची कारवाई

अन्य शस्त्र देखील केले जप्त

या कारवाईदरम्यान घरातून १२५ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), अंदाजे २५ लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ, तसेच १० हजार ४०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

याशिवाय पोलिसांनी एक तलवार, एक कुऱ्हाड, लोखंडी पाइप, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि रोख रक्कम असा मुद्देमालही ताब्यात घेतला.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २५ लाख १८ हजार ८८० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी ओम कुंडलीक गायकवाड आणि यश कुंडलीक गायकवाड यांच्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी ओम गायकवाड याला अटक केली असून, यश गायकवाड याचा शोध सुरू आहे. या अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिता नवले, पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस हवालदार दत्तात्रय राऊत, कौस्तुभ जाधव, गोरखनाथ चिनके, राजेश थोरात, महिबुब नदाफ, महेश जेधे, नितेश जाधव, महिला पोलीस हवालदार सीमा शेंडकर, हर्षा चांदगुडे, पोलीस शिपाई बालाजी शिंदे, संदीप सूर्यवंशी, महिला पोलीस शिपाई पूजा कदम आणि आसावरी धायगुडे यांनी सहभाग घेतला.

पुणे शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!