HIV AIDS in Karnataka | कर्नाटकात एड्स संक्रमण 7000 कॉलेज विद्यार्थी पॉझिटिव्ह


बेंगळुरू: कर्नाटक राज्यात एचआयव्ही (HIV) बाधित तरुणांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

कर्नाटकात एड्स संक्रमण 2.60 लाख लोक एचआयव्ही बाधित

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) च्या अहवालानुसार, राज्यात सध्या सुमारे 2.60 लाख लोक एचआयव्ही बाधित आहेत.

यापैकी फक्त 2.05 लाख रुग्णांना अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (ART) उपचार मिळत आहेत, तर सुमारे 54 हजार लोकांना आपल्याला संसर्ग झाल्याची कल्पनाही नाही. हे लोक अनभिज्ञ राहिल्याने एड्स संक्रमण पसरण्याचा धोका अधिक वाढला आहे.

महाविद्यालयात वाढतोय एड्स संक्रमण

कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक सोसायटी (KSAPS) च्या आकडेवारीनुसार, 18 ते 35 वर्षे वयोगटातील बाधितांची संख्या 2023-24 मध्ये 44,500 होती, ती 2025-26 पर्यंत 66,600 पर्यंत झाली आहे.

यात 18 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांचा समावेश मोठा आहे. अलीकडील अहवालानुसार, या वयोगटातील 7000 हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे आकडे राज्यातील एड्स संक्रमण नियंत्रणासाठी मोठे आव्हान आहेत.

राज्य सरकार सर्व महाविद्यालयात आरोग्य शिबिर घेणार

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी महाविद्यालये, तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एकात्मिक आरोग्य शिबिरे (Integrated Health Camps) आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठ (VTU) आणि उच्च शिक्षण विभागाच्या सहकार्याने KSAPS हे शिबिरे राबवणार आहे. यात एचआयव्ही चाचणी, समुपदेशन, जागरूकता कार्यक्रम आणि आवश्यक उपचारासाठी रेफरल समाविष्ट असतील. सुमारे सात लाख विद्यार्थ्यांना या मोहिमेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

आरोग्य अधिकारी म्हणतात तरुणांनी सुरक्षित राहावे

आरोग्य अधिकारी म्हणतात की, युवकांमध्ये असुरक्षित संबंध, डेटिंग अॅप्सचा अतिरेकी वापर आणि जागरूकतेचा अभाव हे मुख्य कारणे आहेत.

एड्स संक्रमण रोखण्यासाठी ‘First 95’ लक्ष्य (95% लोकांना आपली स्थिती माहिती करून देणे) साध्य करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी, पालक आणि समाजाने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. नियमित चाचण्या, सुरक्षित संबंध आणि वेळीच उपचार घेतल्यास एड्स संक्रमण नियंत्रित करता येईल.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!